आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबालरंगभूमी परिषद शाखा व राज्य प्राथमिक शिक्षक महासंघातर्फे मू.जे. महाविद्यालयात नाट्य कार्यशाळा घेण्यात आली. शिक्षकांसह विद्यार्थी पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील म्हणाले की, बालकांतील अभिनय, नृत्य, संगीत या गुणांचा विकास त्यांच्या व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी आधारभूत ठरणारे गुण आहेत. या कार्यशाळेच्या माध्यमातून रचल्या गेलेल्या पायावर निश्चितच जळगावातील बालकलावंत पुढे जाऊन यशस्वी कलावंत ठरतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
शिक्षणतज्ज्ञ चंद्रकांत भंडारी यांनी अनौपचारिक शिक्षणातून विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता व सांस्कृतिक अंगांचा विकास करत एकूणच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास कसा करता येईल यावर शिक्षकांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांमधील निरीक्षणशक्ती व कुतूहल निरनिराळ्या खेळांमधून कसे वाढवावे या विषयी ‘बालनाट्य आणि शिक्षकांची भूमिका’ या विषयावर संदीप घोरपडे यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे उद्घाटन शाहीर विनोद ढगे व सहकाऱ्यांनी सादर केलेल्या महाराष्ट्र गीताने झाले. केसीई संस्थेचे सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वडोदकर, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कोषाध्यक्षा प्रा. डॉ. शमा सराफ, रंगकर्मी चिंतामण पाटील, शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अजित चौधरी, योगेश शुक्ल या वेळी उपस्थित होते
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.