आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगामध्ये 111 वीजचोरांवर कारवाई:दी़ड लाख युनिटची वीजचोरी उघड; महावितरणने विविध फीडर मधले 290 आकडे काढले

जळगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील वीजचोरी रोखण्यासाठी महावितरणतर्फे सर्वाधिक वीज गळती असलेल्या फीडरची निवड करून कारवाई करण्यात आली. यात गेल्या तीन महिन्यात जळगाव जिल्ह्यात 9 लाख 63 हजार युनिटची तर शहरात 1 लाख 49 हजार 608 युनिटची वीजचोरी उघड झाली. यात शहरातील 111 वीज चोरांवर कारवाई करण्यात आली आहे.

महावितरणच्या प्रत्येक फीडरवर अनेक ग्राहक जोडलेले असतात. फीडरवरून दिली गेलेली वीज आणि संबंधित ग्राहकांच्या मीटरवर नोंद झालेला विजेचा वापर याची पडताळणी करून वीजगळती निश्चित करण्यात येते. महावितरणने माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून प्रत्येक झोनमधील सर्वाधिक वीजगळती असलेले फीडर्स निश्चित केले. त्यानंतर त्यांच्याशी जोडलेल्या घरगुती आणि औद्योगिक ग्राहकांच्या वीज वापरावर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रित करत ग्राहकांच्या मीटरमध्ये अचूक रिडिंग येत आहे का? मीटरमध्ये फेरफार केला आहे का? कोठे आकडा टाकून वीजचोरी होत आहे का? याची माहिती महावितरणतर्फे काढत ही कारवाई करण्यात आली.

212 आकडेबहाद्दरांवर कारवाई

जळगाव विभागात विठ्ठलपेठ फीडरवर 52 जणांवर कारवाई करून 93 हजार 542 युनिटची वीजचोरी उघडसह 212 आकडे काढण्यात आले. बहिणाबाई फीडरवर 29 जणांवर कारवाई करून 38 हजार 466 युनिटची वीजचोरी उघड झाली. तर चिंचोली फीडरवर 30 जणांवर कारवाई करून 17 हजार 600 युनिटची वीजचोरी उघड करण्यात येऊन 78 आकडे काढण्यात आले. या प्रमाणे शहरात एकूण १ लाख 49 हजार 608 युनिटची वीज चोरीसह 111 वीज चोरांवर कारवाईसह 290 आकडे काढण्यात आले.

जिल्ह्यात 9 फीडरवर सर्वाधिक वीज गळती

जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक वीजगळती 9 फीडर आहे.यात भुसावळ विभागातील शेंदुर्णी गावठाण फीडर, चाळीसगाव विभागातील पोहरा गावठाण फीडर, धरणगाव विभागातील पाळधी फीडर, जळगाव विभागतील विठ्ठलपेठ, बहिणाबाई, चिंचोली फीडर, मुक्ताईनगर विभागात मुक्ताईनगर शहर-1 फीडर, पाचोरा विभागातील मुंडाणे गावठाण फीडर, सावदा विभागातील रावेर शहर फीडर या 9 फीडरमधील 652 वीजचोरांवर कारवाई करण्यात आली.

वीज गळती कमी करण्यावर भर

ग्राहकांचे घरात असलेले मीटर घराबाहेर बसवणे, नादुरुस्त तसेच जुने इलेक्ट्रोमेकॅनिकल मीटर बदलणे, तात्पुरता व कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांची पडताळणी, वीजचोरीप्रवण भागात एरिअल बंच केबल टाकणे, तसेच 0 ते 30 युनिट वीजवापर असलेल्या ग्राहकांची पडताळणी करणे आदी कामे महावितरणतर्फे वीज गळती कमी करण्यासाठी केली जात आहेत.

- राजेंद्र मार्के, प्रभारी अधीक्षक अभियंता जळगाव मंडल

बातम्या आणखी आहेत...