आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:विनापरवाना मद्य विक्री करणाऱ्यावर कारवाई

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सुप्रीम कॉलनीत विनापरवाना अवैधरीत्या देशी-विदेशी दारूची विक्री करणाऱ्यावर एमआयडीसी पोलिसांनी सोमवारी छापा मारला. त्याच्याकडून २२ हजारांच्या मद्याच्या बाटल्या जप्त केल्या आहे.

विनायक देवेश्वर मेश्राम (वय ३८, रा. सुप्रीम कॉलनी) हा नाथकृपा कॉम्प्लेक्स येथे विनापरवाना देशी-विदेशी दारूची विक्री करत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून मेश्राम याला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २१ हजार ९२५ रुपये किमतीच्या मद्याच्या बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या आहे. मेश्राम विरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...