आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्धनग्न करून अभ्यास करायला लावला:हाेमवर्क न केल्याने चौथीच्या विद्यार्थ्यांसोबत खासगी क्लासमधील प्रकार

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गृहपाठ (हाेमवर्क) केला नाही म्हणून चाैथी इयत्तेत शिकणाऱ्या 9 वर्षाच्या मुलाला चक्क अर्धनग्न अवस्थेत क्लासमध्ये उभे राहून अभ्यास करण्याची शिक्षा दिल्याचा शहरातील एका खासगी क्लासमधील धक्कादायक प्रकार समाेर आला आहे. या प्रकरणी पिडीत पाल्यांच्या वडीलांच्या तक्रारीवरून शहर पाेलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नाेंद करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, जळगाव महापालिकेत सफाई कामगार म्हणून असलेल्या याेगेश जितेंद्र ढंढाेरे ( रा. शनिपेठ, गुरुनानक नगर) यांचा मुलगा खुशाल (वय ९) हा प्राेग्रेसिव्ह इंग्लिश माध्यम स्कूलमध्ये इयत्ता चाैथीत शिकत आहे. घराजवळ बळीराम पेठेत असलेल्या काेठारी क्लासेस मध्ये त्याला महिन्याभरापूर्वी शिकवणी लावली.

गेल्या काही दिवसांपासून खुशाल हा वडील याेगेश यांच्याकडे क्लासमध्ये मारतात, अशी तक्रार सतत करत हाेता. त्याची खात्री करण्यासाठी व शिक्षकांना भेटण्यासाठी याेगेश ढंढाेरे शुक्रवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास काेठारी क्लासमध्ये गेले हाेते. यावेळी क्लासचा दरवाजा लाेटलेला हाेता.

दाराच्या फटीतून ढंढाेरे यांना त्यांचा मुलगा खुलाश हा एका बाजूला टीशर्ट काढून हातात पुस्तक घेऊन उभा राहून वाचन करीत असल्याचे दिसले. यावर त्यांनी उपस्थित शिक्षिका पल्लवी जितेंद्र इंदाणी यांना विचारले असता खुशाल याने हाेमवर्क केला नसल्याने शिक्षा दिली असल्याचे सांगितले. त्यालाच नाही तर इतर मुलांनांही अशी शिक्षा देताे असेही सांगितले.

दरम्यान, याबाबत संबधित शिक्षकेच्या माेबाईल फाेनवर संपर्क साधला असता ताे त्यांच्या भावाने उचलला व त्यांची प्रकृती ठिक नसल्याचे सांगितले. तसेच क्लासच्या संचालकांचा नंबर देण्यास असमर्थता दर्शविली.

मुलाला टी शर्ट काढून मारत मुलाला अशा पद्धतीची वर्तवणूक दिल्याप्रकरणी याेगेश ढंढाेरे यांनी शहर पाेलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार, या प्रकरणी पनाका रजिष्टरला भादंवि 323 नुसार नाेंद करण्यात आली. तपास शहर पाेलिस करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...