आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मत‎:आदिवासी, मुस्लिम समाजाचे‎ उच्च शिक्षणात प्रमाण कमी‎

जळगाव‎18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उच्च शिक्षणात आदिवासी आणि‎ मुस्लिम समाजाचे प्रमाण पाच टक्के‎ पेक्षा जास्त नाही, ही खेदाची बाब‎ आहे. उच्च शिक्षणासाठी सर्व‎ समावेशकतेचे धोरण अवलंबले‎ पाहिजे. विद्यापीठीय विविध‎ विद्याशाखांचा जर विचार केला तर‎ वैद्यकीय, अभियांत्रिकी, विज्ञान‎ शाखांच्या तुलनेत सामाजिक शास्त्रे‎ या विद्याशाखेकडे बघण्याचा‎ दृष्टिकोन हा निम्न होता; परंतु याच‎ विद्याशाखेतील पदवीधर हा‎ समाजाभिमुख शिक्षण घेऊन समाज‎ बांधणीसाठी काम करतो आहे, असे‎ मत माजी कुलगुरू प्रा. डॉ. के. बी.‎ पाटील यांनी व्यक्त केले.‎

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर‎ महाराष्ट्र विद्यापीठ प्रायोजित आणि‎ लोकसेवक मधुकरराव चौधरी‎ समाजकार्य महाविद्यालय जळगाव‎ विद्यार्थी विकास विभागातर्फे ‘पुढील‎ २५ वर्षांतील आपल्या कल्पनेतील‎ विद्यापीठ’ ही एकदिवसीय‎ कार्यशाळा झाली. या वेळी प्रा.‎ पाटील म्हणाले की, स्वप्नातील‎ विद्यापीठ निर्माण करण्यासाठी‎ सर्वांनी स्वप्न पाहावे. येणाऱ्या‎ काळात रोजगारक्षम आणि गुणवत्ता‎ पूर्ण शिक्षण पद्धती अंगीकारावी‎ लागेल, असे सांगितले. प्राचार्य डॉ.‎ पी. आर. चौधरी यांनी तर‎ बीजभाषक म्हणून प्राचार्य डॉ. एल.‎ पी. देशमुख यांनी नवीन शैक्षणिक‎ धोरणाबाबत मत मांडले. या वेळी‎ प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघुळदे, प्राचार्य‎ डॉ. राकेश चौधरी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...