आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरटीई प्रवेश:2 हजार 161 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित, 779 जागा शिल्लक; लवकरच दुसरी लॉटरी

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आरटीई अंतर्गत राखीव असलेल्या २५ टक्के जागांवरील प्रवेशासाठी लाॅटरीद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी मंगळवारी अंतिम मुदत होती. शेवटच्या दिवसापर्यंत २१६१ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहे. अजूनही पहिल्या लॉटरीतील ७७९ जागा रिक्त आहे.

शिक्षण विभागातर्फे २०२२-२३ वर्षासाठी आरटीई प्रवेशाची प्रक्रिया सुरू असून लॉटरी जाहीर झाल्यानंतर निवड झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती पालकांना एसएमएसद्वारे कळवली होती. आरटीई २५ टक्केची ऑनलाइन अर्ज दाखल केल्यानंतर मार्च महिना अखेर पहिली सोडत ऑनलाइन पार पडली. यात २९४० विद्यार्थ्यांचे निवड झाली असून २३९९ विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी जाहीर झाली आहे. मात्र शेवटच्या दिवसापर्यंत फक्त २१०५ विद्यार्थ्यांनीच प्रवेश निश्चित केल्याने १० मे पर्यंत प्रवेशासाठी मुदतवाढ दिली आहे.

मंगळवारी २१६१ प्रवेश झाले असून पहिल्या यादीतील ७७९ विद्यार्थ्यांचे प्रवेश बाकी राहिले आहे. जिल्ह्यात आरटीई प्रवेशासाठी २८५ शाळा पात्र आहेत. त्यामध्ये एकूण ३१४७ एवढी प्रवेश क्षमता आहे. त्यासाठी एकूण ८३५४ जणांचे अर्ज दाखल झालेले आहे. दरम्यान, पुढील लॉटरीबाबत माहिती लवकरच जाहीर केली जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...