आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोफत शिक्षणाचा अधिकार:372 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित; दुसरी प्रतीक्षा यादी सोमवारी प्रसिद्ध होणार

जळगाव23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोफत शिक्षणाचा अधिकार या योजनेनुसार 25 टक्के प्रवेश अंतर्गत 2022-2023 वर्षांकरिता पहिली प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली होती. जिल्ह्यातील 594 विद्यार्थांचा यात समावेश होता. 6 जून पर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. आतापर्यंत 372 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले असून 222 जागा रिक्त राहिल्या आहे. दरम्यान पालक दुसरी प्रतीक्षा यादीच्या प्रतीक्षेत असून सोमवारी ही यादी प्रसिद्ध होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अंतर्गत 25 टक्के प्रवेश प्रक्रियेकरीता सन 2022-23 च्या शैक्षणिक वर्षाकरिता जळगाव जिल्ह्यात एकूण 594 विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी जाहीर झालेली आहे. त्यापैकी शेवटच्या दिवसापर्यंत 372 प्रवेश निश्चित झाले आहे. या फेरीच्या प्रवेशासाठी 6 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. दरम्यान 222 जागा रिक्त राहिल्या आहे. यंदा जळगाव जिल्ह्यातील 285 शाळांमधील 3147 जागांसाठी ही प्रक्रिया राबविली जात आहे.

त्यानुसार पहिली निवड यादी 2940 विद्यार्थ्यांची जाहीर झाली होती. दरम्यान दुसरी प्रतीक्षा यादी सोमवारी प्रसिद्ध होईल अशी माहिती सूत्रांनी दिली. राज्यभरात 15 जूनपासून शाळा सुरु होत असताना आरटीची प्रवेश प्रक्रिया अद्याप सुरूच असल्याने विद्यार्थी कधी प्रवेश निश्चित करून शाळेत जाणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. प्रवेश प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू राहण्याची शक्यता असल्याने यंदाही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...