आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • Admission Process Started By IGNOU This Year With The Inclusion Of Four New Courses. Deadline Till July 31; Education Can Be Taken Online, Offline

आता आणखी 4 उपशाखांत करता येणार 'एमबीए':इंदीरा गांधी मुक्त विद्यापीठात 4 नवीन अभ्यासक्रम; 31 जुलैपर्यंत प्रवेश प्रक्रिया

जळगाव20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, नवी दिल्ली या विद्यापीठाचे अभ्यासकेंद्र कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात असून या मुक्त विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. इग्नुतर्फे जुलै-2022 पासून एम.बी.ए या पदव्युत्तर वर्गासाठी 4 नवीन अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहे. यात हयुमॅन रिसोर्स मॅनेजमेंट, ऑपरेशन मॅनेजमेंट, फायनान्स मॅनेजमेंट, मार्केटींग मॅनेजमेंट या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. हे अभ्यासक्रम ऑफलाईन व ऑनलाईन या पध्दतीने करता येणार आहे.

पदवी, पदव्युत्तर, पदविका व प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरु झाले आहे. ज्याचे शिक्षण अपूर्ण राहिले आहे किंवा नोकरी अथवा व्यवसाय सांभाळून पदवीधर होण्याची इच्छा आहे, अशा उमेदवारांना किंवा ज्या उमेदवारांचे शिक्षण 10 वी, 12 वी नापास आहेत. अशा उमेदवारांसाठी पदवी पूर्ण तयारी वर्ग (बी.पी.पी.) हा सहा महिन्यांचा कोर्स करुन बी.ए., बी.कॉम,बी.एस.डब्ल्यू, बी.टी.एस.बॅचलर ऑफ कॅम्पुटर ॲपलीकेशन (बी.सी.ए.), बॅचलर ऑफ टुरीझम स्टडीज (बी.टी.एस.) या अभ्यासक्रमास कोणत्याही एका पदवीच्या प्रथम वर्षास प्रवेशित होवू शकतो. तसेच पदव्युत्तर वर्गासाठी संगणकशास्त्र विषयात एम.सी.ए, मास्टर ऑफ टुरीझम स्टडीज (एम.टी.एस.), बी.एस.सी. (नर्सिंग), एम.ए.अर्थशास्त्र, इंग्रजी, इतिहास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, हिंदी, लोकप्रशासन आदी पोस्टग्रॅज्युएट डिप्लोमा इन रुरल डेव्हलपमेंट, एम.ए. (रुरल डेव्हलपमेंट), एम.एस.डब्ल्यू तसेच विविध प्रमाणपत्र अभ्यासक्रम उपलब्ध आहे.

शिक्षणाचे माध्यम हिंदी व इंग्रजी असून इच्छूक उमेदवारांनी विद्यापीठात दुपारी 4 ते 6 व रविवारी सकाळी 9.30 ते 2.00 या वेळेत अथवा मच्छिद्र पाटील यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन समन्वयक प्रा.ए. बी. चौधरी यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...