आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवेशप्रक्रिया:तंत्रनिकेतनची १९ पासून प्रवेशफेरी; जिल्ह्यातील १६ महाविद्यालयांमध्ये ४ हजार जागा आहेत उपलब्ध

जळगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य तंत्रशिक्षण संचालनालय मुंबई यांच्यातर्फे प्रथम वर्ष डिप्लोमासाठी प्रवेशप्रक्रिया राबवली जाते आहे. १९ ऑगस्टपासून पहिली प्रवेशफेरी सुरू हाेत आहे. विद्यार्थ्यांना २० ते २३ ऑगस्टदरम्यान ऑप्शन फॉर्म भरता येतील. त्याची पहिली यादी २५ ऑगस्टला जाहीर होईल.

२०२२-२३साठी पदविका अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षासाठी प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. पहिली यादी जाहीर झाल्यांनतर मिळालेली शाखा, महाविद्यालय २६ ते २९ ऑगस्टपर्यंत विद्यार्थी प्रवेश निश्चित करतील. ३० ऑगस्टपर्यंत विद्यार्थी प्रत्यक्ष संस्थेत उपस्थित राहून कागदपत्रांसह शुल्क भरून प्रवेश निश्चित करू शकतील. शैक्षणिक उपक्रम १२ सप्टेंबरपासून सुरू हाेतील. प्रवेशासाठी २९ सप्टेंबर ही अंतिम मुदत असेल.

दुसऱ्या फेरीसाठी १ ते ४ सप्टेंबरदरम्यान ऑप्शन फॉर्म
दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी रिक्त जागांची माहिती ३१ ऑगस्टला जाहीर होईल. १ ते ४ सप्टेंबरला ऑप्शन फॉर्म भरू शकतील. ६ सप्टेंबरला दुसऱ्या फेरीसाठी तात्पुरत्या जागा वाटप यादी जाहीर होईल. ७ ते १० सप्टेंबरपर्यंत दुसऱ्या फेरीसाठी वाटप केलेल्या जागेची स्वीकृती विद्यार्थी करू शकतील तर ७ ते ११ सप्टेंबर दरम्यान दुसऱ्या फेरीतील अर्ज निश्चित करता येणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...