आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्री सामंत यांचे सूतोवाच:सीईटी, 12 वीच्या 50% गुणांवर प्रवेश; राज्य सरकार लवकरच आणणार नवीन धोरण

जळगाव6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘विद्यार्थी केंद्रबिंदू ठेवून विद्यार्थ्यांसह प्राध्यापक, प्राचार्यांचे बहुतांश शासकीय प्रश्न पदाधिकारी म्हणून आम्ही सोडवले आहेत. आज शासन तुमच्या दारी आहे. आज राज्यपाल महोदय तुमच्या समोर येणार आहेत. माझ्यापुढे मांडलेले विद्यापीठस्तरीय ऑनलाइन परीक्षेतील अवाजवी खर्च, अधिकाऱ्यांचे राजीनामासत्र या प्रशासकीय प्रश्नांसह आर्थिक खर्चाविषयीच्या तक्रारी त्यांच्यापुढे मांडून त्या सोडवा’ असे सांगत राज्याचे उच्च शिक्षण तंत्र मंत्री उदय सामंत यांनी राज्यपालांकडे बाेट दाखवून वेळ मारून नेली.

विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात शनिवारी ‘उच्च तंत्र शिक्षण मंत्रालय कवयित्री बहिणाबाई चाैधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव या उपक्रमाचे आयाेजन करण्यात आले होते. त्यात मंत्री सामंत हे बोलत होते. ‘विद्यापीठाचे जे काही प्रश्न, समस्या असतील त्या प्रशासकीय प्रमुख म्हणून राज्यपालांसमोर मांडणे आवश्यक आहेत. ते माझ्यापेक्षा उजवा न्याय मिळवून देऊ शकतील. ते संवेदनशील आहेत. आम्हाला ते चांगले मार्गदर्शन करतात. तक्रारी सोडवण्याची ही संधी चालून आली आहे. ते सर्वांना नक्की न्याय देतील अशी खात्री आहे’, असा उपराेधिक टाेलाही त्यांनी लगावला.

‘राज्यपाल येत आहेत, तक्रारी त्यांच्याकडे मांडा’

उच्च आणि तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी सामायिक प्रवेश चाचणीतील (सीईटी) गुण आणि बारावीच्या परीक्षेतील गुण यांना प्रत्येकी ५० टक्के प्रमाणात ग्राह्य धरण्याचा विचार राज्य सरकार करीत असून त्याबाबतचे धोरण लवकरच जाहीर करण्यात येईल, असे सूतोवाच राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी येथे केले. युवकांशी संवादाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील कार्यक्रमांसाठी मंत्री सामंत शनिवारी जळगावला आले होते. त्या वेळी युवा सेनेतर्फे ‘युवासंवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात युवकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना त्यांनी या धोरणाबद्दल माहिती दिली. १२ वीच्या परीक्षेला विद्यार्थ्यांकडून महत्त्व दिले जात नाही. या अनुषंगाने ते म्हणाले की, विद्यार्थ्यांना आता १२ वीच्या अभ्यासावरही लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.

वर्णनात्मक उत्तरे लिहिण्याची सवय करावी लागेल

प्रश्न : विद्यार्थ्यांना अभ्यासात काय बदल करावा लागेल ?
सध्या सीईटी परीक्षांनाच महत्त्व असल्याने विद्यार्थी वर्णनात्मक उत्तरांची सवय करीत नाहीत. थेरम्स प्रूव्ह करणे, सूत्र लक्षात ठेवणे, त्याचे आॅब्जेक्टिव्ह लक्षात ठेवणे याकडे लक्ष दिले नाही तर १२ वीच्या गुणांवर परिणाम होतो; सीईटीच्या गुणांवर होत नाही. आता त्यावरही विद्यार्थ्यांना तितकाच भर द्यावा लागेल.

प्रश्न : स्टेट बोर्डालाही अभ्यासक्रमात बदल करावा लागेल का ?
नाही. राज्य परीक्षा मंडळाला अभ्यासक्रमात बदल करण्याची गरज भासणार नाही.

प्रश्न : सीईटी निकालावर परिणाम होईल ? स्पर्धा मोठ्या प्रमाणात वाढेल. वर्णनात्मक उत्तरांची सवय नसलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणांवर परिणाम होईल.

प्रश्न : विद्यार्थ्यांवर काय परिणाम होईल ?
विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला फारसे महत्त्व न देता पहिल्यापासून सीईटीवर फोकस करतात. आता शाळेतील नियमित अभ्यासावरही तेवढेच लक्ष केंद्रित करावे लागेल.

प्राध्यापक भरतीला मंजुरी
मंत्री सामंत म्हणाले की, राज्यात २०८८ प्राध्यापकांच्या संवर्गनिहाय भरतीला नुकतीच मंजुरी देण्यात आली. त्याबाबतचा शासनादेश घेऊनच आपण जळगावला आलो आहोत. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी मात्र वित्त विभागाची परवानगी मिळाली तरच त्यांच्या भरतीला परवानगी देता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...