आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एप्रिल महिन्यात राबवण्यात आलेला ‘स्कूल कनेक्ट प्रोग्रॅम’सह आयटीआय उत्तीर्ण झाल्यानंतर थेट अभियांत्रिकीत प्रवेश मिळणार आहे. या कारणाने यंदा आयटीआयचे प्रवेश वाढू शकतात. दहावीच्या परीक्षेचा निकाल अद्याप जाहीर झाला नसला तरी निकालाची वाट न पाहता शासकीय आयटीआयच्या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध झाली आहे. १७ जूनपासून २१ ट्रेडच्या ९४० जागांसाठी प्रवेश प्रक्रीया सुरू होईल. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना १५ जूनपासून संकेतस्थळावर माहिती पुस्तिका उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांना काही अडचणी आल्यास संकेतस्थळावर दिलेल्या दुरध्वनीवर सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना संपर्क साधून शंकाचे निवारण करता येणार आहे. https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. यासह विद्यार्थ्यांना अर्जात दुरुस्ती करणे, प्रवेश अर्ज शुल्क भरता येईल. २२ जूनपासून अर्ज स्वीकृती केंद्रात मूळ कागदपत्रांच्या तपासणीनंतर प्रवेश अर्ज निश्चित करता येणार आहे. त्यानंतर प्रवेश अर्ज शुल्क भरल्यावर विद्यार्थ्यांना पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प सादर करता येणार आहे. दोन ट्रेड मंजुरीसाठी प्रस्ताव अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शन सुरु झाले आहे. यावर्षी इन्स्ट्रुमेंट मेकॅनिकल व ऑपररेटर मेकॅनिकल मशिनिष्ट या दोन ट्रेडच्या वाढीव जागांच्या मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. ते मंजूर झाल्यास प्रवेश संख्या वाढेल. १७ जूनपासून अर्ज नोंदणी व निकालानंतर प्रवेश सुरु होतील. ए. आर. चौधरी, प्राचार्य शासकीय आयटीआय
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.