आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फार्मसी काैन्सिलच्या गलथानपणामुळे रखडलेली प्रवेश प्रक्रिया अखेर सुरू:कॉलेजांना महिन्याभरात द्यावे लागणार प्रतिज्ञापत्र; PCI ने घातली अट

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

फार्मसी कौन्सिलचा गलथानपणामुळे रखडलेली प्रवेश प्रक्रिया अखेर सुरू झाली आहे. असे असताना त्यासाठी पीसीआयने महाविद्यालयांना महिन्याभरताच प्रतिज्ञापत्र द्यावे लागणार अशी अट घातली आहे.

अशा आहेत जागा

फार्मसी काैन्सिल ऑफ इंडियाच्या (पीसीआय) गलथान कारभारामुळे संपूर्ण देशभर फार्मसीचे प्रवेश रखडले होते. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणावर सुनावणी सुरू असतानांच फार्मसी काैन्सिलने एक पाऊल मागे घेतले. कुठल्याही महाविद्यालयांतील जागा कमी न करता आहे त्याच जागांवर प्रवेश देण्यास अनुमती दिली आहे. जळगाव जिल्ह्यात 12 महाविद्यालयात बी फार्मसीच्या 966 आणि डी फार्मसी 1071 जागा आहेत.

प्रतिज्ञापत्रामध्ये महाविद्यालयांत उपलब्ध सोयी-सुविधा, प्राध्यापक-स्टाफ-स्टुटंड गुणोत्तर हे नियमानुसार असावे, असे स्पष्टपणे नमूद केले आहे. तंत्रशिक्षण संचालनालयानेही प्रवेशाची प्रक्रिया सुरू करण्याची अपेक्षा विद्यार्थी - पालक आणि महाविद्यालयांकडून व्यक्त होत आहे. पीसीआयचे अध्यक्ष बदलानंतर नव्या धोरणांची अंमलबजावणी यंदापासूनच करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यामुळे जुन - जुलैत सुरू होणारी प्रवेश प्रक्रिया ऑक्टोबर संपूनही सुरूच झाली नाही. याचे मुख्य कारण महाविद्यालयांचे इन्स्पेक्शन करण्याची प्रक्रिया उशिराने सुरू केली. अनेक महाविद्यालयांचे निरीक्षण न होता, कुठलेही कारण न देता, बाजू मांडण्याची संधी न देताच जागा कमी झाल्याने प्रकरण न्यायालयात गेले होते.

जळगाव जिल्ह्यातील स्थिती

डी.फार्म 12 महाविद्यालये, 1071 जागा

बी.फार्म 12 महाविद्यालये, 966 जागा

डी.फार्म 2 वर्षांच्या अभ्यासक्रमाची मुदत संपली

बी फार्म आणि डी फार्मसाठी मुदत वाढविण्यात आली आहे. परंतु, दोन वर्षाच्या डी फार्मसी या अभ्यासक्रमासाठी मात्र कुठलीही मुदतवाढ अद्याप झाली नाही. 31 ऑक्टोबर रोजी मुदत संपलेली आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवाशाला मुदतवाढीची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सुविधा द्याल तरच पुढील वर्षी जागा कायम

काैन्सिलच्या पत्रामध्ये यंदा जागा कमी न करता कायम ठेवल्या तरीही नियमानसार सुविधा आणि स्टाफ नियुक्त नसेल तर मात्र पुढच्या वर्षी संबंधित महाविद्यालयांच्या जागा नक्की कमी केल्या जातील. त्यामुळे महाविद्यालयांना आगामी वर्षभरात या सर्व बाबींची नियमानुसार पूर्तता करावी लागेल.

बातम्या आणखी आहेत...