आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थंडी:20 दिवसांनंतर किमान तापमान 10 अंशाच्या नीचांकावर; थंडी वाढली

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात तब्बल २० दिवसानंतर किमान तापमान १० अंश सेल्सिअसच्या निच्चांकी पातळीवर पाेहचले आहे. त्यामुळे जिल्ह्यात थंडीची तीव्रता वाढली आहे. साेमवारी किमान तापमान १० अंश सेल्सिअस तर कमाल तापमान २९ अंश सेल्सिअसच्या पातळीवर हाेते. उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यामुळे थंडी वाढली असून त्यामुळे दिवसाही गारठा जाणवत आहे. जिल्ह्यात गेल्या महिन्यात १० डिसेंबर राेजी ८.५ अंश सेल्सिअस एवढ्या निच्चांकी तापमानाची नाेंद झाली हाेती.

त्यानंतरच्या आठवड्यात मात्र किमान तापमान २१.९ अंशाच्या उच्चांकावर गेल्याने थंडी गायब हाेऊन दिवसासाेबतच रात्रीचा गारठाही वाढला हाेता. डिसेंबर अखेरपर्यंत कडाक्याच्या थंडीची प्रतीक्षा हाेती. दरम्यान, १ राेजी ११ अंशावर असलेले किमान तापमान २ जानेवारीला १० अंशाच्या निच्चांकी पातळीवर गेले आहे.

बातम्या आणखी आहेत...