आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घाेषणा:दीड महिन्यानंतर मनपाची आज महासभा

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मनपाची दीड महिन्यांनी बुधवारी महासभा आयाेजित करण्यात आली आहे. बऱ्याच कालावधीनंतर सभेचे आयाेजन झाल्याने नगरसेवकांकडून आयत्या वेळी विषय पटलावर ठेवण्यासाठी आग्रही भूमिका घेण्यात आली. त्यामुळे महापाैर जयश्री महाजन यांनी नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात अर्थात पंधरा दिवसांनी पुन्हा महासभा घेण्याची घाेषणा केली आहे. बुधवारी सकाळी ११ वाजता आयाेजित सभेत व्यासपीठावर आयुक्त म्हणून देविदास पवार हेच काम पाहणार आहेत.

या वेळी शासकीय व अशासकीय अशा ३४ विषयांवर निर्णय हाेणार आहे. यात १०० काेटींतील शिल्लक ५८ काेटींच्या कामांच्या यादीला मंजुरी मिळू शकते. भाजपकडून सादर करण्यात आलेल्या कामांबाबत शिवसेनेकडून काय भूमिका घेतली जाते? याकडे लक्ष लागून आहे. मनपाच्या आक्षेप नसलेल्या व आक्षेप असलेल्या सर्वच कर्मचाऱ्यांना सातव्या वेतनाचा लाभ देण्याची मागणी महासभेत केली जाण्याची शक्यता आहे. यासाठी नगरसेवक कैलास साेनवणेंसह अन्य सदस्य आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान, पुढच्या महिन्यात हाेणाऱ्या सभेत विविध याेजनांशी संबंधित प्रस्ताव सादर केले जाण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...