आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • After Anand Dighe, He Held The Post Of Shiv Sena District Chief For The Longest Time; Jeevache Ran For The Victory Of Dilip Bhole |marathi News

विजय:आनंद दिघेंनंतर सर्वाधिक काळ सांभाळले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पद; दिलीप भोळेंच्या विजयासाठी केले जीवाचे रान

जवळगाव21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे निष्ठावान शिवसैनिक राजेंद्र दायमा यांना उमेदवारी जाहीर झाली होती. प्रचारासाठी खुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आले होते. व्यासपीठावर येताच बाळासाहेबांनी दायमांची उमेदवारी रद्द करण्याची घोषणा केली. एवढा मोठा धक्का असतानाही बाळासाहेबांचे आदेश आनंदाने स्वीकारत दुसऱ्याच दिवसापासून दिलीप भोळेंच्या प्रचारासाठी गाडीत फिरले आणि त्यांच्या विजयासाठी प्रयत्न केले. सच्चा, दिलदार आणि कट्टर शिवसैनिक अशी माजी जिल्हाप्रमुख राजेंद्र दायमा यांची ओळख कायम स्मरणात राहील. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राहिलेले राजेंद्र दायमा यांचे सोमवारी निधन झाले.

त्यांच्या रूपाने एकनिष्ठ शिवसैनिक गमावला. परिस्थिती आणि सामाजिक व्यवस्थेत छोट्या समाजात भुसावळात शिवसेनेचे काम केले. काम करीत असताना मामा बियाणी यांच्यासारख्या मित्रांबरोबर लहानाचे मोठे झाले व झपाटून काम करत असताना शिवसेनेच्या प्रवाहात सामील झाले होते.

बातम्या आणखी आहेत...