आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी जास्त:बासमतीनंतर बारीक तांदळाला आखाती‎ देशांत मागणी वाढल्याने भाव वाढलेलेच‎

जळगाव‎25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दरवर्षी जानेवारी महिन्यापासून‎ नव्या तांदळाची आवक हाेते. मे‎ महिन्यांपर्यंत येणाऱ्या नव्या‎ तांदळाची वर्षभर साठवणूक‎ करण्यासाठी माेठ्या प्रमाणावर‎ खरेदी केली जाते. नवा तांदूळ‎ आला की जुन्या तांदळाच्या‎ भावाच्या तुलनेत नव्याचे दर १५ ते‎ २० रुपये कमी असतात. मात्र,‎ गेल्या दाेन वर्षांपासून आखाती‎ देशात बासमती तांदळासाेबत‎ बारीक तांदळाचीही मागणी‎ वाढल्याने बाजारपेठेत काेलम या‎ तांदळाचे दर वाढलेले असल्याचे‎ व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.‎

जानेवारीपासून दाणाबाजारात‎ महाराष्ट्रातील चंद्रपूर, गाेंदियासह‎ छत्तीसगड, कर्नाटक, आंध्र येथून‎ कालीमूछ, काेलम, चिनाेर,‎ परिमल या बारीक तांदळाची तर‎ पंजाब व हरियाणा येथून बासमती‎ तांदळाची आवक हाेते. बारीक‎ तांदूळ हा नियमित वापरासाठी‎ पसंत केला जाताे. ताे वर्षातून तीन‎ वेळा येताे; परंतु त्यातही चंद्रपूर व‎ गाेंदिया येथून येणारा काेलम या‎ तांदळाला पसंती असते. या‎ तांदळाची बाजारपेठेत दिवसाला‎ आठ ते १२ टन एवढी उलाढाल‎ हाेते. यंदा आवक दरवर्षांप्रमाणे‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ असली तरी आखाती देशात‎ बासमतीप्रमाणे बारीक तांदूळ‎ त्यातही काेलम या प्रकाराला‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ मागणी असल्याने भाव जास्त‎ असल्याचे व्यापारी प्रवीण‎ पगारीया यांनी सांगितले.‎

दर चढते असल्याची अशी आहे विविध कारणे
बासमती तांदळाच्या तुलनेत‎ रेग्युलर बारीक तांदळाचा वापर‎ अधिक हाेताे. त्यामुळे त्याची‎ मागणी जास्त आहे.‎जानेवारी-मे दरम्यान येणारा‎ तांदूळ वर्षभर साठवला जाताे.‎ नेहमीच्या तुलनेत दुपटीपेक्षा‎ जास्त मागणी असते.‎ बासमती तांदळाप्रमाणे दाेन‎ वर्षांपासून काेलम तांदळाचे स्टीम‎ व बाॅइल प्रकाराला आखाती‎ देशात मागणी जास्त.‎

नव्या तांदळाचे किलाेचे दर : बासमती (१३० रुपये),‎ कालीमूछ ६३ (रुपये), काेलम (६३ रुपये), चिनाेर (४४ रुपये),‎ आंबेमाेहर (८५ रुपये), परिमल (३० रुपये).‎

बातम्या आणखी आहेत...