आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांचा अभ्यासिकांकडे कल:लाॅकडाऊननंतर अभ्यासिकांची संख्या 80 वर

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या दीड महिन्यात अभ्यासिकांकडे विद्यार्थ्यांची विचारणा वाढली आहे. उत्सवकाळात विद्यार्थ्यांचा अभ्यासिकांकडे कल वाढला आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. दरम्यान, लाॅकडाऊनपूर्वी शहरात २० वर असलेली अभ्यासिकांची संख्या आता तब्बल ८० झाली आहे. स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर अर्ज भरण्यापासून तर परीक्षेपर्यंत विद्यार्थी अभ्यासिकांकडे वळत हाेते; परंतु लाॅकडाऊननंतर परीक्षेच्या वेळापत्रकाशिवाय अन्य विद्यार्थीदेखील अभ्यासिकांकडे येत आहेत. जळगाव शहरात मध्यवर्ती भागाशिवाय उपनगरांमध्येदेखील अभ्यासिका वाढल्या आहेत. त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षेशिवाय नियमित महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांकडूनदेखील विचारणा वाढली आहे.

सामाजिक संस्थांचाही पुढाकार
काेराेनाच्या लाटेपूर्वी शहरातील मध्यवर्ती भागामध्ये अभ्यासिकांची संख्या २० पर्यंत हाेती. लाॅकडाऊननंतर अभ्यासिका पुन्हा सुरू झाल्या. शहरात आता अभ्यासिकांची संख्या ८० पर्यंत पाेहाेचली आहे. काही अभ्यासिका सामाजिक संस्थांकडून तर काही महाविद्यालयांकडून सुरू करण्यात आल्या आहेत. स्पर्धा परीक्षा केंद्र चालवणाऱ्यांच्या स्वत:च्या अभ्यासिका आहेत.

जळगावात अभ्यासिका वाढल्या
एमपीएससीच्या वर्ग-ब ची परीक्षा ऑक्टोबरमध्ये व वर्ग-क ची नोव्हेंबरमध्ये परीक्षा आहे. बँकिंगची परीक्षा जवळ येत आहेत. त्यामुळे जळगावातील खासगी आणि महाविद्यालयीन अभ्यासिकेला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद अधिक वाढला आहे.

सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत वेळ
समूहाने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी अभ्यासिकांना प्राधान्य देत आहेत. यात बहुतांश विद्यार्थी हे बाहेरगावचे असून ते हे विद्यार्थी दिवसभर अभ्यासिकेमध्ये असतात. सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत अभ्यासिका सुरू असतात. जळगाव, नशिराबाद, म्हसावद, आसाेदा, ममुराबाद, शिरसाेली, वावदडे, कानळदा येथून विद्यार्थी येथे येतात.

एकाग्रतेमुळे वेळ सत्कारणी
परीक्षेची तयारी करताना सलग काही तास अभ्यास करणे घरी शक्य होत नाही. अभ्यासिकेमध्ये आपल्या सोबत अन्य विद्यार्थीदेखील अभ्यास करतात. अभ्यासिकेतील वातावरण एकाग्रतेसाठी उत्तम असते. परीक्षा जवळ असल्याने अभ्यासाला पूर्ण वेळ देता येऊ शकतो. त्यामुळे अनेक विद्यार्थी परीक्षा काळात अभ्यासिकेमध्ये येतात. - निकिता नेहेते, विद्यार्थिनी.

ग्रुपने परीक्षेची करताे तयारी
आम्ही कॉलेजचे मित्र ग्रुपने स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहोत, बहुतेक मित्र येथेच राहणारे असून आम्ही दोघे जण अभ्यासिकेसाठी जामनेरवरून येतो.- सौरभ पाटील, विद्यार्थी, जामनेर

बातम्या आणखी आहेत...