आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जल्लोष:एकनाथ खडसेंच्या विजयानंतर समर्थकांचा जळगावात जल्लोष; फटाक्यांची आतषबाजी

जळगाव8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विधान परिषदेच्या चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचा विजय झाल्यानंतर जळगावात कार्यकर्ते व समर्थकांनी रात्री आनंदोत्सव साजरा केला. चौकाचौकात फटाके फोडून व घाेषणाबाजी करत जल्लोष करण्यात आला. माजी मंत्री एकनाथ खडसे विजयी झाल्याचे जाहीर होताच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. रात्री १० वाजेच्या सुमारास राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष रिंकू चौधरी यांच्यासह कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कार्यालयाजवळ फटाके फोडले. त्यानंतर खडसे समर्थक दिलीप माहेश्वरी व सहकाऱ्यांनी रेल्वे स्टेशन चौकात, टॉवर चौकात, शिवाजी महाराज पुतळ्याजवळ फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

तसेच जोरदार घोषणाबाजी करून जल्लाेष करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस दिलीप माहेश्वरी, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष वाय. एस. महाजन, माजी नगरसेवक राजू मोरे, विशाल देशमुख, राहुल पाटील, महेंद्र पाटील, नितीन मोरे, बंटी सोनवणे, प्रेम मोरे, किरण सपकाळे, विजय अहिरे, समाधान सपकाळे आदी सहभागी झाले होते. महादेवाला दुग्धाभिषेक खडसेंना विधान परिषदेत विजय संपादन मिळावा म्हणून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सूरज नारखेडे, ललित नारखेडे, सिद्धार्थ सपकाळे, उमाकांत पाटील, चेतन इंगळे, मंगेश भोले, पंकज व्यास, राकेश चौधरी, आकाश रत्नपारखी यांनी महादेवाला दुग्धाभिषेक केला. आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी कार्यालयाजवळ जल्लोष करताना कार्यकर्ते.

बातम्या आणखी आहेत...