आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकुऱ्हे पानाचे येथून जवळच असलेल्या मांडवेदिगर येथे दरवर्षी पौष पौर्णिमेला मोती मातेचा यात्राेत्सव साजरा करण्यात येताे. परंतु दोन वर्षांच्या कोरोना काळात त्यात खंड पडला होता. परंतु या वर्षी निर्बंध हटल्याने शुक्रवारी मोठ्या उत्साहात यात्राेत्सव साजरा झाला. सुमारे ५० हजार भाविकांनी या काळात माेती मातेचे दर्शन घेतले. मध्य प्रदेश राज्यातील लोखंडे येथे मोती मातेचे मूळ देवस्थान (पीठ) आहे. तसेच मांडवेदिगर येथे देखील जागृत देवस्थान आहे. २००५ मध्ये तत्कालीन आमदार संतोष चौधरी यांनी मंदिराचा जीर्णोद्धार करून माेती मातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. ५० हजार लोकांनी घेतले दर्शन गर्दीमुळे कायदा व सुव्यवस्था कायम रहावी, यासाठी भुसावळ तसेच जळगाव येथील पोलिस अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात आले हाेते. त्यांनी चोख बंदोबस्त ठेवला.
त्यामुळे भाविकांचीही साेय झाली. बंजारा समाजातील लोक तसेच इतर सर्व समाजातील लोक दरवर्षी यात्राेत्सवानिमित्त मोती मातेच्या दर्शनासाठी येतात. दरवर्षी भाविकांच्या संख्येत वाढ होत आहे. या वर्षी जवळपास ५० हजार भाविकांनी दर्शन घेतले. भाविकांच्या मनोकामना पूर्ण झाल्यानंतर आपल्या वजनाइतके मोतीचुराचे लाडू, बर्फी किंवा जिलेबीचा भोग देवीला चढवण्यात येताे. मंदिरापासून दोन किलोमीटर अंतरावर भाविकांची दर्शनासाठी गर्दी केली होती. यात्राेत्सवासाठी मोती माता मंदिर ट्रस्ट, मांडवेदिगर तसेच ग्रामपंचायत, प्रशासन व गावकऱ्यांनी परिश्रम घेतले. दाेन वर्षांनी भरलेल्या यात्रेमुळे भाविकांमध्ये चैतन्य पसरले हाेते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.