आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदाेलन‎:विराेध हजाराे लाेकांचा; पण‎ आंदाेलनात केवळ सहा जण‎

जळगाव‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंप्राळा उड्डाण पुलाची लांबी कमी करुन‎ राधाकृष्ण चौकात उतरवण्याच्या मागणीसाठी‎ शिंदे गटाचे नगरसेवक अॅड. दिलीप पोकळे‎ यांच्यासह सहा जणांनी सोमवारी‎ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे‎ आंदोलन केले. विशेष म्हणजे या कामाला‎ हजाराे लाेकांचा विराेध असताना‎ आंदाेलनाला अपेक्षित प्रतिसाद दिसला नाही.‎ पुलाची लांबी कमी करुन राधाकृष्ण‎ चौकात ताे उतरवावा किंवा या चौकात‎ अंडपास देण्यात यावा.

कानळदा रस्ता टी‎ पॉईंटपर्यंत काँक्रीटीकरण व दोन्ही बाजूला‎ आरसीसी गटार तयार करुन देण्याचीही‎ त्यांची मागणी होती. धरणे आंदोलनाला अॅड.‎ पोकळे यांच्यासह प्रफुल्ल पाटील, गोपाळ‎ कोळी, लक्ष्मण पोळ यांच्यासह केवळ सहा‎ नागरिक उपस्थित होते. अपेक्षेप्रमाणे‎ आंदोलनस्थळी नागरिक आले नाहीत.‎ त्यानंतर पोकळे हे सुद्धा आंदोलन स्थळावरुन‎ निघून गेले. प्रशासनास निवेदन देण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...