आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकृषी विभागाकडून खरीप पीक विमा काढण्यासाठी ३१ जुलैपर्यंत शेतकऱ्यांना मुदत देण्यात आली हाेती. ही मुदत संपली असून, जिल्ह्यात किती शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला आहे याची माहिती संकलित करण्यासाठी कृषी विभागाने सर्व बँका, ई-सेवा केंद्रांकडील संपूर्ण माहिती मागवली आहे.
पीक विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांना ई-सेवा केंद्रासह बँकांनाही परवानगी दिलेली हाेती. विमा काढण्याची शेवटची मुदत ३१ जुलै असताना शेवटच्या दिवशी रविवारीदेखील राज्यात १८ लाख ऑनलाइन अर्ज आले हाेते. राज्यात यंदा ८८ लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवल्याचा अंदाज आहे.
बाबतची माहिती जिल्हास्तरावरून एकत्रित केली जाते आहे. जळगाव जिल्ह्यातील बँकाची माहितीदेखील एकत्रित संकलित केली जात आहे. दरम्यान, वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर यंदा शेतकऱ्यांचा कल पीक विमा उतरवण्याकडे आहे. त्यामुळे यावर्षी विमाधारक शेतकऱ्यांची संख्या वाढल्याचा अंदाज व्यक्त हाेत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.