आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुलाब और कांटे:कृषिमंत्री सत्तार 20 मिनिटे लेट; गुलाबरावांनीच उरकले कृषी महोत्सवाचे उद्घाटन

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथे मूळजी जेठा महाविद्यालयाच्या खान्देश विभागीय कृषी महोत्सवाचे उद्घाटन कृषिमंत्री अब्दुल सत्तार व पालकमंत्री गुलाबराव पाटलांच्या उपस्थितीत होणार होते. मात्र, सत्तारांना २०-३० मिनिटे उशीर झाला. गुलाबरावांनी तोवर उद्घाटन करून टाकले. काही वेळानंतर सत्तार आले. त्यांचा पारा चढला. मग व्यासपीठावर त्यांनी गुलाबरावांची दाढी धरली. त्यानंतर केलेल्या भाषणात मंत्री गुलाबरावांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. सत्तारांनी गुलाबरावांसमोरच ‘येथे जातीचेच पाहिजे..., माझी गणती येरागबाळ्यात काढली,’ अशी खदखद व्यक्त केली.

पाटलांची मनधरणी : त्यांचा स्वभाव विनोदी ‘सत्तारांचा स्वभाव विनोदी आहे. विनोद करत त्यांनी माझी दाढी धरली. जिल्हा नियोजन भवनात सकाळी ११ वाजेची बैठक नियोजित होती. त्याबाबत त्यांना कल्पना दिली. त्यांचे भाषण होईपर्यंत थांबलो.’

सत्तारांची आगपाखड येथे जातीचेच पाहिजे ‘मेळाव्याच्या वेळेस बैठक ठेवली. त्यांनी किमान एक तासभर तरी माझ्यासोबत मेळाव्यासाठी उपस्थिती द्यायची होती. ती एक म्हण आहे, येथे जातीचेच पाहिजे..., माझी गणती येरागबाळ्यात काढली.’

कार्यक्रम 10:30 चा, गुलाबरावांकडून 10:47 वाजता उद्घाटन, सत्तार पाेहाेचले 11:07ला जळगाव जिल्हा प्रशासनाकडे आलेल्या कृषिमंत्री सत्तार यांच्या दौरा कार्यक्रम पत्रिकेनुसार, शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता मेळाव्याच्या उद्घाटनास कृषिमंत्री उपस्थित राहणार असल्याचे नमूद होते. मात्र मंत्री सत्तार नियोजित वेळेत कार्यक्रमस्थळी पोहोचले नाहीत. १०:४७ वाजता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्घाटन उरकून टाकले. त्याच्या २० मिनिटांनंतर सत्तार यांचे आगमन झाले.

शुक्रवारी जळगावात कृषी महोत्सवाला २० मिनिटे उशिरा पोहोचलेले कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यासपीठावर आल्यानंतर हास्यविनोदात गुलाबरावांची दाढी धरली. अर्थात, गुलाबरावांनी लवकर जाण्याची घोषणा करताच नाराजी व्यक्त करायलाही कृषिमंत्री विसरले नाहीत. (छाया : आबा मकासरे)

बातम्या आणखी आहेत...