आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काैतुकास्पद निर्णय:देवांग कोष्टी समाजाच्या सभेत आहेर ; दुखवटा पद्धती बंद करण्याचा ठराव

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

देवांग कोष्टी समाजाची त्रैमासिक सर्वसाधारण सभा रविवारी फॉरेस्ट कॉलनीत घेण्यात आली. या सभेअंतर्गत २५० दहावी ते पदवीधर विद्यार्थ्यांच्या सत्कारासह लग्नात आहेर, दुखवटा पद्धती बंद करण्याचा ठराव या त्रैमासिक बैठकीत पारीत करण्यात आला. तसेच या निमित्ताने समाजातील १० ज्येष्ठ नागरिकांचा गौरवही या निमित्ताने करण्यात आला.

देवांग कोष्टी समाजाची त्रैमासिक सर्वसाधारण सभा रविवारी घेण्यात आली. या सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यात लग्नात आहेर तसेच दुखवटा प्रथा बंद करण्यावर सर्वाधिक चर्चा झाली. लग्नात व दुखवट्यात वाजवले जाणारे आहेर हे पडून असतात. तर दुखवट्यातील आहेर तर कधीच वापरही जात नसल्याने ही प्रथा बंद केली जावी, असा ठराव करण्यात आला. हा ठराव सर्व समाज सदस्यांतर्फे मंजूर करण्यात आला. दुखवट्यातील आहेर हे वापरण्यायोग्य नसल्याने ते वर्षांनुवर्षे तसेच पडून राहातात. यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव निवृत्त उप शिक्षणाधिकारी डॉ. डी. एम. देवांग यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी देवांग-कोष्टी समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत पंधारे, उपाध्यक्ष अजय अळंदे, सचिव सुनील भागवत समाज बांधव, महिला आदी उपस्थित होते.

अडीचशे विद्यार्थ्यांचा करण्यात आला गौरव : देवांग कोष्टी समाजातील दहावी ते पदवीधर दरम्यानच्या अडीचशे विद्यार्थ्यांकांचा गौरव करण्यात आला. यात विद्यार्थ्यांना ट्रॉफी, मेडल व वह्यांचा देऊन गौरविण्यात आले. तसेच यानिमित्ताने पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना क्रमित पुस्तकांचा सेट देऊन मान्यवरांच्या हस्ते गाैरवण्यात आले.

ड्रेसचे कापड, साडी देऊन गाैरव
देवांग कोष्टी समाजातील ८० किंवा त्यावरील वयोवृद्ध १० ज्येष्ठ नागरिकांचा समाजातर्फे सत्कार करण्यात आला. या ज्येष्ठ नागरिकांमध्ये पाच महिला तर पाच पुरुष ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. यातील ५ ज्येष्ठ नागरिकांना ड्रेसचे कापड देऊन, तर ५ ज्येष्ठ महिलांचा साडी देऊन गौरव करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...