आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंद अकरा सिग्नल सुरू हाेणार:आकाशवाणी, अजिंठा चाैकात नवीन दाेन सिग्नल

जळगाव23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात बंद असलेले अकरा सिग्नल मनप सुरू करणार आहे. याशिवाय महामार्गावरील अजिंठा व आकाशवाणी चाैकात लाेकसहभागाने नवीन सिग्नल उभारले जाणार आहेत. मनपात बुधवारी दुपारी महापाैर जयश्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. सुप्रीम फाउंडेशनचे संजय प्रभूदेसाई, नगरसेवक बंटी जाेशी, शहर अभियंता चंद्रकांत साेनगिरे, वदि्युत विभागप्रमुख संजय पाटील, पाेलिस अधिकारी उपस्थित हाेते. बैठकीत बंद सिग्नल यंत्रणा सुरू करण्यावर चर्चा करण्यात आली.

बैठकीला उपस्थित सुप्रिम कंपनीचे संजय प्रभूदेसाई यांना सुप्रिम फाउंडेशनच्या माध्यमाने सहकार्य करण्याचे साकडे घालण्यात आले. अजिंठा चाैक व आकाशवाणी चाैकात सिग्नल व्यवस्था फाउंडेशनच्या माध्यमातून करून देण्याची तयारी दाखवली आहे. येत्या महासभेत प्रस्ताव दिला जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...