आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुणवत्ता खराब:जळगाव शहरातील हवेची गुणवत्ता खराब

जळगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात गेल्या दाेन दिवसांपासून धूळ आणि धुक्यामुळे हवेची गुणवत्ता खराब झाली आहे. हवेच्या गुणवत्तेचा एक्युआय (एअर क्वाॅलिटी इंडेक्स) तब्बल १३५च्या उच्चांकावर पाेहचला आहे. ढगाळ वातावरण निवळून तापमान १६ अंशांवर आले आहे.

थंडीची तीव्रता वाढल्याने धुकेही वाढले आहे. गेल्या आठवड्यात ढगाळ वातावरणाने तापमानात झालेली वाढ पुन्हा कमी झाली आहे. थंडीत दवबिंदू आणि धुक्याचे प्रमाण वाढले आहे. शनिवारी शहरात धुके, धूळ आणि काहीशा धुरामुळे हवेची गुणवत्ता खराब झाली हाेती. शहरात धुलिकणांचे प्रमाण वाढल्याने हवेचा एक्युआय १३५वर गेला हाेता.

बातम्या आणखी आहेत...