आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूमिगत केबल हलवण्यात येणार:अजिंठा चाैफुलीचे संयुक्त माेजमाप हाेणार ​​​​​​​

जळगाव6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातून जाणाऱ्या औरंगाबाद मार्गावरील अजिंठा चाैफुली ते आर.एल. चाैफुली दरम्यान भूमिगत केबल हलवण्यात येणार आहे. त्यासाठी महावितरण, महापालिका, राज्य महामार्ग व मक्तेदार यांच्या उपस्थितीत संयुक्त माेजमाप करण्यात येईल. याच मार्गावरून वाहत जाणारे सांडपाणी भूमिगत गटारीने चाैफुली ओलांडून पुढे न्यायचे की सातपुडा ऑटाेमाेबाइल शेजारून गणेशपुरी नाल्याकडे वळवायचे याबाबत न्हाईच्या प्रकल्प संचालकांसाेबत महापालिकेत बैठक घेण्यात येणार आहे.अजिंठा चाैफुली परिसराची मालकी व जबाबदारी महापालिका, महामार्ग प्राधिकरण, राज्य महामार्ग, पाेलिस विभागाची वाहतूक शाखा यांची संयुक्त आहे. मात्र, इथल्या

मंगळवारी न्हाईसाेबत बैठक
बाजार समितीकडून अजिंठा चाैकात नैसर्गिक उतार असल्याने येणारे सांडपाणी अजिंठा चाैफुलीखालून भूमिगत गटारीने पुढे काढायचे की बाजार समितीच्या बाजूने चाैफुलीलगत शाेरूमच्या हद्दीतील रस्त्याची जागा अधिग्रहित केली आहे.

केबल स्थलांतराचा प्रस्ताव द्या
अजिंठा चाैफुली ते महावितरण मुख्य कार्यालयादरम्यानच्या अंतरात टाकलेली व काँक्रीट रस्त्याला अडथळा ठरणारी भूमिगत केबल स्थलांतरासाठी किती खर्च येईल? याचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना या वेळी देण्यात आल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...