आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:जळगावची आकांक्षा राेज 50 किमी सायकलिंगचा करतेय सराव; राष्ट्रीय स्पर्धेमध्येेही हाेणार सहभागी

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आकांक्षा गोरख म्हेत्रे वय १५ वर्षे. तिने आजपर्यंत अनेक क्रीडा प्रकारांत चुणूक दाखवली. वैयक्तिक, सांघिक असे सारेच खेळ ती जिंकण्यासाठी नाही तर आनंदासाठी खेळते. तिने आतापर्यंत सायकलिंगचे रोड सायकलिंग, एमटीबी सायकलिंग व ट्रॅक सायकलिंग अशा तीन प्रकारांत राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले आहे. ती राेज ५० किलोमीटर सायकलिंग व ४ किलोमीटर पोहण्याचा नियमित सराव करते.

आकांक्षा वयाच्या आठव्या वर्षापासून विविध प्रकारच्या खेळांत सहभागी होत आली आहे. ती दररोज ऊन, वारा, पाऊस थंडी यांची कोणतीही तमा न बाळगता जळगाव ते फेकरी नाका व परत जळगाव अशी ४० ते ५० किलोमीटर सायकलिंग व चार किलोमीटर पोहण्याचा सराव करते. यात तिने ट्रॅक सायकलिंगमध्ये सुवर्णपदक जिंकण्याची जिद्द ठेवली आहे. तिला प्रशिक्षक सागर सोनवणे यांचे सहकार्य मिळत आहे.

आतापर्यंत या स्पर्धांमधून केली विशेष कामगिरी
जळगावच्या या ‘आयर्न गर्ल’ने आतापर्यंत विविध स्पर्धा जिंकल्या आहेत. आकांक्षाने आतापर्यंत राष्ट्रीय रोड रेस स्पर्धा, एमटीबी रेस स्पर्धा व ट्रॅक सायकलिंग या तिन्ही प्रकारांत सुवर्णपदक पटकावले. तर अनेक विभागीय, राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्पर्धाही तिने गाजवल्या आहेत. राज्यस्तरीय जलतरण, मॉडर्न पेंयनथलॉन, ट्रायथलॉन अशा स्पर्धेत तीने विशेष कामगिरी केली आहे.

अशा असतात सायकली
रोड सायकलिंगसाठी मेरिडा कंपनीची १ लाख ८० हजारांची तर ट्रॅक सायकलिंगसाठी डोलन कंपनीची ३ लाख ५० हजारांची सायकल आहे. टायरमध्ये ४ लाख ६० हजार रुपयांची स्पर्धात्मक व्हीलची सायकल उपलब्ध आहे.

अशा होतात स्पर्धा
सायकलिंगच्या मैदानाला (वेलोड्रॅम) म्हणतात. हे मैदान २५० मीटरचे असते. ५०० मीटर स्प्रींट, २ मीटर परश्यूट अंतर असते. यात रोड सायकलिंग, एमटीबी सायकलिंग व ट्रॅक सायकलिंग अशा तीन प्रकारात स्पर्धा होतात.

बातम्या आणखी आहेत...