आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआकांक्षा गोरख म्हेत्रे, वय १५ वर्षे. तिने आजपर्यंत अनेक क्रीडा प्रकारांत चुणूक दाखवली. तिने आतापर्यंत सायकलिंगचे रोड सायकलिंग, एमटीबी सायकलिंग व ट्रॅक सायकलिंग अशा तीन प्रकारांत राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. ती राेज ५० किलोमीटर सायकलिंग व चार किलोमीटर पोहण्याचा सराव करते.
आकांक्षा वयाच्या आठव्या वर्षापासून खेळांत सहभागी होत आली आहे. ती दररोज उन्ह, वारा, पाऊस थंडी यांची कोणतीही तमा न बाळगता जळगाव ते फेकरी नाका व परत जळगाव अशी ४० ते ५० किलोमीटर सायकलिंग व चार किलोमीटर पोहण्याचा सराव करत आहे. यात तिने ट्रॅक सायकलिंगमध्ये सुवर्णपदक जिंकण्याची जिद्द ठेवली आहे. या सरावात तिला प्रशिक्षक सागर सोनवणे यांचे सहकार्य मिळत आहे. आकांक्षा ही पुण्यात श्री शिवछत्रपती क्रीडापीठ (वेलोड्रॅम) स्टेडियममध्ये राष्ट्रीय ट्रॅक सायकलिंगची तयारी करते आहे.
राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्पर्धांमधून विशेष कामगिरी
आकांक्षाने आतापर्यंत विविध स्पर्धा जिंकल्या आहेत. आकांक्षाने आतापर्यंत राष्ट्रीय रोड रेस स्पर्धा, एमटीबी रेस स्पर्धा व ट्रॅक सायकलिंग या तिन्ही क्रीडा प्रकारांत सुवर्णपदक पटकावले आहे. याचबरोबर अनेक विभागीय, राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्पर्धाही तिने गाजवल्या आहेत. तसेच राज्यस्तरीय जलतरण, मॉडर्न पेंयनथलॉन, ट्रायथलॉन अशा स्पर्धा तिने गाजवल्या आहे.
अशा आहेत सायकली
आकांक्षाकडे विशेष सायकली आहेत. यात रोड सायकलिंगसाठी १ लाख ८० हजारांची तर ट्रॅक सायकलिंगसाठी ३ लाख ५० हजारांची सायकल उपलब्ध आहे. टायरमध्ये ४ लाख ६० हजारांची व्हीलची सायकल आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.