आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावच्या आकाक्षांने विविध सायकलिंग स्पर्धेत पटकावले सुवर्ण:म्हणाली - ही सायकल राइड माझ्या जगण्याचे बळ आहे

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आकांक्षा गोरख म्हेत्रे हिने सायकलिंगचे रोड, एमटीबी सायकलिंग व ट्रॅक सायकलिंग अशा तीन सायकलिंगच्या प्रकारांत राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले आहे. ही राइडच आकांक्षाला जगण्याचे बळ देत असल्याचे तिचे म्हणणे आहे.

अशी आहे राईड

सायकलिंगच्या सरावासाठी आकांक्षा दररोज 50 किलोमीटर सायकलिंग व 4 किलोमीटर पोहण्याचा नियमित सराव करते. आकांक्षा वयाच्या आठव्या वर्षापासून विविध प्रकारच्या खेळांमध्ये सहभागी होत आली आहे. ती दररोज ऊन, वारा, पाऊस थंडी यांची कोणतीही तमा न बाळगता जळगाव ते फेकरी नाका व परत जळगाव अशी 40 ते 50 किलोमीटर सायकलिंग व 4 किलोमीटर पोहण्याचा सराव करत आहे. यात तिने ट्रॅक सायकलिंगमध्ये सुवर्णपदक जिंकण्याची जिद्द ठेवली आहे. या सरावात तिला प्रशिक्षक सागर सोनवणे यांचे सहकार्य मिळत आहे.

राष्ट्रीय ट्रॅक सायकलिंग स्पर्धेची तयारी

सध्या आकांक्षा ही पुण्यातील श्री शिवछत्रपती क्रीडापीठ येथील (वेलोड्रॅम) स्टेडियममध्ये राष्ट्रीय ट्रॅक सायकलिंग स्पर्धेची तयारी करत आहे. आकांक्षाला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घ्यायचा विचार असला तरी वय बसत नसल्याने त्यात भाग घेऊ शकत नसल्याची खंतही तिने व्यक्त केली.

या स्पर्धांमधून विशेष कामगिरी ...

जळगावच्या या ‘आयर्न गर्ल’ने आतापर्यंत विविध स्पर्धा जिंकल्या आहेत. आकांक्षाने आतापर्यंत राष्ट्रीय रोड रेस स्पर्धा, एमटीबी रेस स्पर्धा व ट्रॅक सायकलिंग या तिन्ही क्रीडा प्रकारांत सुवर्ण पदक पटकावली आहे. याच बरोबर अनेक विभागीय, राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्पर्धाही तिने गाजवल्या आहेत. तसेच राज्यस्तरीय जलतरण, मॉडर्न पेंयनथलॉन, ट्रायथलॉन अशा विविध प्रकारच्या स्पर्धांतूनही तिने विशेष कामगिरी केली आहे.

सरावासाठी विशेष सायकली

सरावासाठी वेगवेगळ्या विशेष सायकली आहेत. यात रोड सायकलिंगसाठी मेरिडा कंपनीची 1 लाख 80 हजार रुपयांची तर ट्रॅक सायकलिंगसाठी डोलन कंपनीची 3 लाख 50 हजार रुपयांची सायकल उपलब्ध आहे. तर टायरमध्ये 4 लाख 60 हजार रुपयांची स्पर्धात्मक व्हीलची सायकल उपलब्ध आहे.

बातम्या आणखी आहेत...