आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजामनेर तालुक्यातील सर्व आठ जिल्हा परिषद गट राखीव झाले आहेत. त्यामुळे काेणत्याही विद्यमान सदस्याला पुन्हा संधी मिळणार नाही. गेल्या दाेन वर्षांपासून तयारीला लागलेल्या दुसऱ्या फळीतील राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर आरक्षणामुळे पाणी फिरले आहे. एकाही गटात खुल्या प्रवर्गाला संधी नसल्याने अनेक इच्छुकांचा हिरमाेड झाला आहे.
जामनेर हा माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांचा मतदारसंघ असून, जिल्हा परिषद गटांत गेल्या वेळी भाजपचेच वर्चस्व राहिले आहे. यावेळीदेखील जिल्हा परिषद निवडणूक लढवण्यासाठी भाजपत इच्छुकांमध्ये माेठी स्पर्धा हाेती. तर राष्ट्रवादी आणि शिवसेना या पक्षांकडूनदेखील उमेदवार तयारीला लागले हाेते. जिल्हा परिषद गटांची रचना झाल्यानंतर इच्छुक उमेदवारांनी गटांमध्ये मेळावे, गाठीभेटी आणि खर्चही सुरू केला हाेता; परंतु आरक्षणात तालुक्यातील एकही गट खुल्या प्रवर्गासाठी मिळाला नाही. एकूण आठपैकी चार आेबीसी, तीन एससी आणि एक एसटीसाठी गट राखीव झाला आहे.
सहा गट महिला राखीव
जिल्हा परिषदेच्या एकूण आठ गटांपैकी तब्बल सहा गट महिलांसाठी राखीव झाले आहेत. पहुरपेठ, पहूर कसबे आणि ताेंडापूर या तीन गटांत आेबीसी महिला, सामराेद आणि फत्तेपूर गटात एससी महिला आणि खडकी गटात एसटी महिला उमेदवारासाठी जागा राखीव आहे. तर नेरी दिगरमध्ये ओबीसी पुरुष आणि पाळधीत एससी पुरुषांसाठी जागा राखीव आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.