आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रयत्न:दूध संघ बिनविराेधसाठी सर्वपक्षीय पॅनलचे प्रयत्न

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा सहकारी दूध संघाच्या निवडणुकीत तालुका मतदारसंघात उमेदवारी करणाऱ्या उमेदवाराला संपूर्ण जिल्ह्यात मतदान मिळविण्यासाठी फिरावे लागणार आहे. त्यामुळे सर्वपक्षीय पॅनलमध्ये स्थान निश्चित करण्याकडे उमेदवारांचा कल आहे. ही निवडणूक बिनविराेध हाेण्यासाठी राजकीय प्रयत्न सुरू असून त्यात मुक्ताईनगर व जळगाव तालुक्यात अडचणी येत असल्याचे समजते.

दूध संघ निवडणुकीत स्थानिक एेवजी नेत्यांनी मुंबईतच रणनिती निश्चित केली आहे. त्यात बहुतांश स्थानिक नेते, इच्छुक उमेदवार सर्व पक्षीय पॅनलसाठी तयार असल्याची माहिती आहे. प्रत्येक उमेदवाराचे भवितव्य जिल्ह्यातील सर्व मतदारांवर अवलंबून असल्याने निवडणुकीचा प्रचार खर्च प्रत्येक उमेदवाराला परवडणार नाही. अपेक्षीत मते मिळविण्यासाठी इच्छुकांना सर्व पक्षीय नेत्यांची गरज पडेल. त्यामुळे सर्वपक्षीय पॅनलची निवडणूक बिनविराेध करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

दाेन तालुक्यात अडचणी
मुक्ताईनगर तालुक्यात जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे उमेदवार असतील. मात्र, सर्वपक्षीय पॅनलबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. दुसरीकडे जळगाव तालुक्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील, महापाैर जयश्री महाजन व अन्य काही जण इच्छुक आहेत.

बातम्या आणखी आहेत...