आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकाल:बारावीत शाळांचा निकाल 100 टक्के तरी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी घसरली

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

माध्यमिक शालांत परीक्षा अर्थात बारावी परीक्षेचा निकाल ८ जून रोजी ऑनलाइन पद्धतीने दुपारी घोषित करण्यात आला. गत दोन वर्षापासून असलेल्या कोरोना महामारीमुळे यंदा बहुतांश शाळांचा निकाल जरी १०० टक्के लागला असला तरी विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या गुणांची टक्केवारी मात्र घसरली आहे. हा ऑनलाइन अभ्यास व लिखाणाची सवय कमी झाल्याचा परिणाम असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दरम्यान, मुख्याध्यापक, शिक्षक, संस्थाचालकांनी सर्व गुणवंतांचा सत्कार केला.

अमळनेर | बारावीचा आज ऑनलाइन निकाल जाहीर करण्यात आला असून त्यात अमळनेर तालुक्यातील ३ हजार ३१८ पैकी ३ हजार २४५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तालुक्याचा एकुण ९७.७९ टक्के निकाल लागला असून अमळनेर तालुक्यातील २४ माध्यमिक विद्यालयांपैकी ९ महाविद्यालयांचा १०० शंभर टक्के लागला आहे. प्रताप महाविद्यालयाची यशाची परंपरा कायम प्रताप महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. विज्ञान शाखेतून प्रथम भंडारी अर्पिता राजेश ९१.८३, सूर्यवंशी हर्षदा गणेश ९०.५०, शिंदे प्राची संजय, पवार टिशा राजेश ८८.८३, देसले जागृती प्रशांत ८८.६६, पाटील फाल्गुनी शिवाजी ८८.६०. कला शाखेतून प्रथम पाटील स्नेहल गोकुळ ८७.१६, पाटील निकिता सुहास ८६.६६, पाटील पूजा हरीलाल ८४.३३, सूर्यवंशी कल्याणी यशवंत ८२.८३, चौधरी सुजाता संजय ८२.१६ तर वाणिज्य शाखेतून प्रथम शाह वर्धन मनीष ९४.१६, अग्रवाल कंचन जितेंद्र ९४, भंडारी किंजल जितेंद्र ९२.६७, तोलाणी साहिल मुलचंद, शाह भक्ती उदय ९२.३३, सैनानी भाविका अशोककुमार ९१.६६.

चोपडा | येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील मिहिका अचल अग्रवाल हीने ९३.१७ टक्के गुण मिळवून वाणिज्य शाखेतील बारावीत पहिला क्रमांक पटकावला आहे. तिला अकाउंट आणि गणित या दोन विषयात १०० पैकी १०० गुण मिळाले आहेत. मिहिका अग्रवाल ही चोपडा महावीर पतपेढीचे व्यवस्थापक अचल अग्रवाल यांची कन्या आहे. ‘पंकज’चा १०० टक्के निकाल ... येथील पंकज उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यशाची परंपरा कायम राखली असून शाळेचा १०० टक्के निकाल लागला. कला व विज्ञान शाखेचे एकुण १८७ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झालेले होते. हे सर्व विद्यार्थी पास झाले आहेत. यात ७० %च्यावर १३८ विद्यार्थ्यांनी गुण प्राप्त करत यश संपादन केले आहे. बारावी विज्ञान शाखेत प्रथम तीन आलेल्या विद्यार्थ्यामध्ये ओम सुनील महाजन (८७.६७%) प्रथम, रुपाली चंद्रशेखर सोनवणे (८६.८३) व्दितीय, तनया महेश पाटील (८६.५०) तृतीय, तर कला शाखेत प्रथम तीन आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये वृंदा मनोहर बडगुजर (८४.८३%) प्रथम, दीपक नारायण सूर्यवंशी व मोहिनी विनोद न्हायदे (८३.३३) व्दितीय, अश्विनी संजय साळुंखे (७९.५०%) तृतीय या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.

बातम्या आणखी आहेत...