आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • Ambadas Danve Asked The Authorities To Get Less Help Due To Heavy Rains, Only 77 Thousand Farmers Got Help During Heavy Rains In 48 Revenue Circles

अतिवृष्टीची मदत कमी:अंबादास दानवेंनी अधिकाऱ्यांना विचारला जाब, अतिवृष्टी 48 महसूल मंडळात, मदत 77 हजार शेतकऱ्यांनाच

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात जुलै महिन्यात ८६ पैकी ४८ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झालेली असताना ५० टक्के शेतकरी बाधीत शेतकऱ्यांना अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचा लाभ मिळायला हवा होता. ६ लाख ९१ हजारावर खातेदार असताना ७७ हजारावरच शेतकरी कसे बाधीत झाले.या आकडेवारीविषयी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शंका व्यक्त केली.त्याबाबत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारत पंचनामे झाले नसल्याचे स्पष्ट होत असल्याचे सांगितले.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते दानवे शुक्रवारी जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले होते.त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली.महापौर जयश्री महाजन, जिल्हाधिकारी अमन मित्तल,पोलिस अधीक्षक एम.राजकुमार,अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी,निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील तसेच शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.दानवे यांनी अतिवृष्टीने बाधीत शेतकरी,नुकसानीची मदत व पीक विमा या विषयांच्या आढावा घेतला.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी माहिती दिली.जुलै महिन्यात ४८ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली.

७७ हजार ९७० शेतकरी बाधीत झाले. ५० टक्के क्षेत्रात अतिवृष्टी झालेली असताना १२ ते १३ टक्केच शेतकरी बाधीत कसे झाले.हे प्रमाण खूपच कमी असून आकडेवारीविषयी दानवे यांनी शंका उपस्थित केली.नुकसानीने बाधीत शेतकऱ्यांसाठी १८ कोटींचा प्रस्ताव शासनाला पाठवण्यात आला होता.१० हजार शेतकऱ्यांना मदत देण्यात आली.उर्वरित ६७ हजारावर शेतकऱ्यांचे काय? असा प्रश्नही दानवेंनी जिल्हाधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना विचारला.पुन्हा पुन्हा त्याच महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्याने शेतकरी संख्या कमी असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी सांंगितले.

जळगावचा प्रस्ताव का गेला नाही?

ऑक्टोबर महिन्यात झालेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यात २४ हजार ३४८ हेक्टरील पिकांचे नुकसान झाल्याने २९ हार ३४२ शेतकरी बाधीत झालेले आहेत.या शेतकऱ्यांना नुकसानीची मदतासाठी निधी मागणीचा प्रस्तावच शासनाला पाठवला नसल्याची विरोधी पक्षनेत्यांनी विचारणा केल्यानंतर बैठकीत समोर आली.ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पिकांच्या नुकसानीबाबत मंत्रिमंडळाच्या समितीने नुकसान भरपाई रक्कम मंजूर केलेली आहे.इतर जिल्ह्यांना मदत प्राप्त झाली.जळगाव जिल्ह्याचा प्रस्ताव प्रलंबीत का? पंचनामे उशीराने झाल्याने प्रस्ताव प्रलंबीत असून आगामी तीन ते चार दिवसांमध्ये पाठवणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले.

केळीवर रोगांचा प्रादुर्भाव

केळी पिकावर सीएमव्ही रोगाबाबत नुकसान भरपाई मिळाली नसल्याबाबत शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांनी मुद्दा उपस्थित केला.पूर्वी शेतकरी केळीची रोपे तयार करत असताना केळीवर एवढा रोगांचा प्रादुर्भाव होत नव्हता.टिश्यू कल्चर केळी रोपे कमजोर असल्याने त्यावर रोगांचा जास्त प्रादुर्भाव होत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी या बैठकीत दिली.सीएमव्हीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष मदतीचा प्रस्ताव पाठवला असल्याबाबत विरोधी पक्षनेत्यांनी त्यांचे प्रशंसा केली.

बातम्या आणखी आहेत...