आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशानं आसं व्हतं ग्रंथ अभ्यासक्रमात:अमरावती विद्यापीठाची दखल जामनेरचे डॉ. अशोक कोळींच्या साहित्यसेवेचा सन्मान

जळगाव6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कृषीसंस्कृतीचं वैभव, ग्रामीण जीवन, भवताल, गावगाडा साहित्यात अचूकपणे मांडणे यात जामनेरचे डॉ. अशोक कौतिक कोळी यांचा हातखंडा आहे. त्यांच्या ‘अशानं आसं व्हतं’ या ललित ग्रंथाची अमरावती येथील संत गाडगेबाबा विद्यापीठाने वाङ‌्मय पारंगत एम.ए. मराठी अभ्यासक्रमासाठी निवड केली. सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून हे पुस्तक अभ्यासक्रमात असेल.

डॉ. अशोक कोळी हे खान्देशातील प्रथीतयश मिळवलेले लेखक आहेत. आपल्या स्वतंत्र लेखनशैलीने त्यांनी वाड्मय क्षेत्रात नावलौकिक मिळवलेला आहे. जामनेर तालुक्यातील सुनसगाव सारख्या लहानशा खेड्यातून येऊनही, घरात कुठलीही लेखन वाचनाची पार्श्वभूमी नसताना त्यांनी साहित्य प्रतिभा विकसित केली आहे. गावखेड्यातील कष्टकरी, शेतमजूर कुटुंबात जन्मलेले कोळी यांनी ‘अशानं आसं व्हतं’ या पुस्तकातून आपले बालपण व बालपणीचे कष्टमय जीवन शब्दबद्ध केलेले आहे. पुणे येथील नामांकित साधना प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केलेले आहे.

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारानेही सन्मानित
व्यवसायाने जळगाव जिल्हा परिषदेच्या सेवेत प्राथमिक शिक्षक असलेले डॉ. अशोक कोळी हे राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित आहेत. इयत्ता चाैथीच्या मराठी बालभारती पाठ्यपुस्तकात त्यांच्या ‘धूळपेरणी’ या कवितेचा सामावेश आहे. मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातही त्यांच्या कथेची निवड झालेली आहे. त्यानंतर आता अमरावतीच्या संत गाडगेबाबा विद्यापीठाने त्यांचे साहित्य अभ्यासक्रमात समाविष्ठ केले.

बातम्या आणखी आहेत...