आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतीक्षा संपणार‎:अमृत याेजना डीपीआर,‎ 21 मार्चला ठरेल एजन्सी‎

जळगाव15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमृत २.० च्या टप्प्यासाठी डीपीआर‎ काेणामार्फत करायचा याबाबत सुरू असलेला गुंता‎ अखेर सुटण्याची चिन्हे आहेत. जुनी एजन्सीचे काम‎ रद्द केल्यानंतर मजीप्रा की शासन नियुक्त १६‎ एजन्सीपैकी काेणाची नियुक्ती करायची याचा निर्णय‎ पाच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर २१ मार्च राेजी महासभेत‎ हाेणार आहे. शहरातील पाणीपुरवठा व मलनिस्सारण‎ याेजनेच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामासाठी राज्यभरात‎ महापालिकांनी कामाला सुरुवात केली आहे; परंतु‎ जळगाव महापालिकेत प्रशासनाकडून येणारे चुकीचे‎ प्रस्ताव आणि राजकीय मतभेद यामुळे अजूनही‎ याेजनेचा डीपीआर तयार हाेऊ शकलेला नाही.‎

आॅक्टाेबर २०२२मधील महासभेत जुनी एजन्सी रद्द‎ करणे, नव्याने सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे ठरले‎ हाेते. त्यानुसार शहर अभियंता यांनी २१ मार्च राेजी‎ हाेणाऱ्या महासभेसाठी प्रस्ताव सादर केला आहे.‎

बातम्या आणखी आहेत...