आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव गेल्या चार ते पाच वर्षांपासून शहरात राबवण्यात येणाऱ्या अमृत अभियानातील दाेन्ही योजना केव्हा पूर्णत्वास येतील याबाबत ठामपणे सांगता येत नाही. मात्र खर्चाचे आकडे पाहता योजना पूर्णत्वास आल्याचे चित्र आहे. पाणीपुरवठा याेजनेचा आतापर्यंत ८५ टक्के खर्च झाला असून, मलनिस्सारण योजनेचा ९८ टक्के निधी खर्च झाला आहे.
जळगाव शहरात अमृत अभियानांतर्गत पाणीपुरवठा योजना २०१८-१९ पासून तर मलनिस्सारण योजना २०१९-२० पासून राबवण्यात येत आहे. या दोन्ही योजनांसाठी चोवीस महिन्यांचा कार्यकाळ निश्चित केला होता. मात्र चार ते पाच वर्षे उलटायला आले तरी अजून योजना पूर्ण होऊ शकलेल्या नाहीत. योजना केव्हा पूर्ण होणार असा प्रश्न होताच पुढच्या महिन्याची घोषणा होत आहे. एकीकडे योजना अंमलबजावणी केव्हा सुरू होईल आणि सेवा केव्हा मिळेल याची शाश्वती नाही.
असा झाला खर्च
पाणीपुरवठा योजनेसाठी २०१८-१९ मध्ये ६९ कोटी ६६ लाख रुपये, २०१९- २० मध्ये ५ कोटी ७२ लाख रुपये, २०२०-२१ मध्ये ३९ कोटी १७ लाख रुपये, २०२१-२२ मध्ये ३९ कोटी ५० लाख रुपये, २०२२-२३ मध्ये ६२ कोटी ७१ लाख रुपये असा पाच वर्षांत २१६ कोटी ७७ लाख ७७ हजार रुपये खर्च झाला . खर्चाची आकडेवारी ८५.६० % आहे. मलनिस्सारण याेजनेसाठी २०१९- २० मध्ये ८ कोटी २८ लाख रुपये, २०२०-२१ मध्ये ९५ कोटी ३३ लाख रुपये, २०२१-२२ मध्ये ५९ कोटी ४४ लाख रुपये, २०२२-२३ मध्ये ३४ कोटी ८३ लाख रुपये असा पाच वर्षांत १९७ कोटी ८९ लाख ०९ हजार रुपये खर्च झाला आहे. खर्चाची आकडेवारी ९८.३३ % आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.