आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्णय:खुल्या जागेत झाडांवर चालवली कुऱ्हाड

जळगाव24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील गुरूकुल काॅलनीतील खुल्या जागेतील अडचणीचे ठरत नसतानाही झाडे ताेडल्याची तक्रार अॅड. कुसुम पाटील यांनी केली आहेे. पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या घरात पालापाचाेळा पडत असल्यामुळेच ही झाडे ताेडल्याचे म्हणणे आहे. तर खुल्या जागेत उद्यान करायचे असल्याने वाळवी लागलेले झाड ताेडल्याचा दावा मनपाने केला आहे. अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतरच झाडे ताेडण्याचा निर्णय झाल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

गुरूकुल काॅलनीतील मनपाच्या जागेत पूर्वी जळगाव नागरी सहकारी पतपेढीची इमारत हाेती. पतपेढीची इमारत पाडल्यानंतर त्या जागेत मनपाकडून उद्यानाची निर्मीती केली जाणार आहे. या जागेत निंब, सागाची झाडे उंच वाढली आहेत. या जागेच्या शेजारीच मनपाचे अभियंता एस. एस. पाटील यांचे निवासस्थान आहे. त्यांच्या घराच्या संरक्षण भिंतीला असलेले झाडे सुस्थितीत असतानाही केवळ पालापाचाेळा पडत असल्यामुळे मनपाने झाडे ताेडल्याची परवानगी दिल्याचे अॅड. कुसूम पाटील यांचे म्हणणे आहे. अभियंता पाटील यांनी आराेप फेटाळत पूर्वी पतपेढी चालकांनीच झाडे ताेडण्याची परवानगी मागीतली हाेती, असा दावा त्यांनी केलेला आहे.

पाहणी केल्याचा आहे दावा
शहर अभियंता चंद्रकांत साेनगिरे यांनी गुरूवारी प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर झाडे ताेडण्यात आली. झाडांना वाळवी लागली हाेती. त्यामुळे ते केव्हाही काेसळण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. त्यामुळे झाडे ताेडण्याची परवानगी दिल्याचे पर्यावरण विभागाकडून सांगण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...