आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारामानंद नगर पोलिस ठाण्यात शनिवारी पोलिस निरीक्षकांच्या दालनात पोलिस उपनिरीक्षकाशी वाद घालून पोलिस कर्मचाऱ्याने त्यांना स्टीलची बाटली फेकून मारली होती. त्यामध्ये उपनिरीक्षक जखमी झाले होते. या प्रकरणी त्यांच्या फिर्यादीवरुन सोमवारी पोलिस कर्मचाऱ्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनमोल सत्तार पटेल या पोलिस नाईकाविरुध्द शासकीय कामात अडथळा तसेच इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. फसवणुकीच्या तक्रारीवरुन नूर मोहम्मद गफूर यास पोलिसांनी चौकशीसाठी शनिवारी रामानंद नगर पोलिस ठाण्यात बोलविले होते.तो चौकशीसाठी आला होता.तक्रार अर्जाशी संबंधीत कागदपत्रे आणून देत असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.त्यानंतर तो पोलिस ठाण्यातून निघून गेला.बउपनिरीक्षक देशमुख यांनी त्याच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला.त्याचा मोबाईल क्रमांक बंद होता .बऱ्याच वेळानंतर त्याने फोन उचलला पोलिस नाईक पटेल यांनी फोन बंद करण्यास सांगितल्याचे त्याने देशमुख यांना सांगितले.अर्ज माझ्याकडे असून चौकशी करणार आहे.देशमुख यांच्याकडे जावू नको,असेही पटेल यांनी सांगितले. सकाळी 11.30 वाजता पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांनी देशमुख यांना चौकशीसाठी बोलविले.त्यावेळी शिंदे यांच्या दालनात नूर मोहम्मद हा बसलेला होता.थोड्याच वेळात पटेल हे तेथे आले.पोलिस निरीक्षकांनी अर्जाबाबत विचारणा केली.त्याने सांगितले की,देशमुख म्हणाले, दोघे एकाच जातीचे असून एकमेकांना मदत करीत आहात,असे नूर याने सांगितले. हे ऐकूण पटेल यांनी पोलिस निरीक्षकांच्या टेबलवरील पाण्याने भरलेली स्टीलची बाटली हातात घेतली. शिविगाळ करीत जातीभेदाचा आरोप केला. त्यानंतर पाण्याने भरलेली बाटली घेवून देशमुख यांच्या अंगावर धावून गेला. त्याने हातातील बाटली देशमुख यांना मारली. देशमुख यांनी डाव्या हाताने अडविली.त्यांच्या हातातील घड्याळ तुटून खाली पडले.हाताला मुका मार बसला. त्यानंतर त्याने शिविगाळ केली.त्याचा आवाज ऐकूण पोलिस ठाण्यातील इतर कर्मचारी तेथे आले.पोलिस निरीक्षकांनी त्याला बाजूला केले.बकर्मचाऱ्यांनी त्याला दालनाबाहेर काढले. त्याच्यापासून उपनिरीक्षकांची सुटका केली. बाहेर काढल्यानंतरही तो शिवीगाळ करीत होता, या आशयाची फिर्याद उपनिरीक्षक देशमुख यांनी दिली आहे.त्यानुसार पटेल याच्याविरुध्द शासकीय कामात अडथळा निर्माण केल्यासह भादंवी कलम 332,324,294 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.