आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:दुपारी एक तासझोपणे आरोग्यासाठी फायद्याचे

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मानसिक तणाव, चिंता, भीती त्यामुळे झोपेत बाधा येते. २४ तासापैकी आपण जेव्हा कार्यरत असतो त्यावेळी ज्ञानेन्द्रीय व कर्मेंद्रिय थकतात. तो थकवा कमी होण्यासाठी झोप आवश्यक असते. झोपण्यापूर्वी टीव्ही, मोबाइल पाहू नये. शांत वातावरण प्रकाश अत्यल्प व मन प्रसन्न करणारे वातावरण असावे. डाव्या कुशीत झोपलेले अतिशय चांगले असते. त्यामुळे रक्ताभिसरण क्रिया व पचनशक्ती चांगली होते. उन्हाळ्यामध्ये दुपारी एक तास तरी झोपावे. वेळ नसेल तर सात ते आठ मिनट डोळे बंद करून स्वस्थ पडावे, असा सल्ला डॉ. आनंद दशपुत्रे यांनी दिला.

रेडक्रॉस व सायकाॅलाॅजिकल कॉन्सिलर्स असोशिएशनतर्फे भावस्पर्श सपोर्ट ग्रुप स्थापन करण्यात आला अाहे. या अंतर्गत व्याख्यानमालेचे उद्घाटन रेडक्रॉस भवन येथे झाले. यात ‘झोप व त्यातील अडथळे’ या विषयावर डॉ. आनंद दशपुत्रे यांनी व्याख्यान दिले. या कार्यक्रमास रेडक्रॉसचे उपाध्यक्ष गनी मेमन, चेअरमन विनोद बियाणी, रक्त केंद्र चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, रक्त केंद्र सचिव डॉ. अपर्णा मकासरे, धनंजय जकातदार, पुष्पा भंडारी, शांता वाणी, वैद्य डॉ. आनंद दशपुत्रे, सायकाॅलाजीकल कॉन्सिलर्स असोसिएशनच्या डॉ. प्रतिभा हरणखेडकर, प्रशासकीय अधिकारी लक्ष्मण तिवारी अादी उपस्थित होते.

धनंजय जकातदार यांनी सांगितले, मानसिक आरोग्याचा समतोल राखण्यासाठीचा हा उपक्रम असून या भावस्पर्श सपोर्ट गृपच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला एका विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात येईल असे सांगितले. गनी मेमन यांनी रेडक्रॉसच्या माध्यमातून सुरु असलेल्या सर्व सेवा उपक्रमची माहिती दिली. डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी यांनी रेडक्रॉस रक्त केंद्र अति उच्च रक्त चाचणी प्रणालीचा वापर करून त्याची शुद्धता तपासली जाते. नॅट टेस्टेड रक्त चाचणीमुळे विषाणू संक्रमणाची शक्यता ९९.९९ टक्के दुरावते, असे सांगितले.

चांगल्या आरोग्यासाठीझोप आवश्यक
डॉ. आनंद अष्टपुत्रे यांनी सांगितले, ‘झाेप पूर्ण झाली की माणसाचे ज्ञानेंद्रिय व कर्मेंद्रिय पुन्हा कार्यरत हाेतात व आपण उत्साहाने काम करताे. जन्मत: २४ तास बाळझोपते. जसजसे त्याचे वय वाढत जाते तसतसे त्याचीझोपेची वेळ कमी हाेत जाते. वयाेवृद्ध माणसे साधारणपणे ६ ते ७ तासझोपतात. त्यामुळे चांगल्या आरोग्यासाठीझोप ही गरजेची आहे.

निद्रानाशामुळे हृदयविकार, अर्धांगवायू
डॉ. अपर्णा मकासरे यांनी सांगितले,झोप हा सर्व प्राणीमात्रांना परमेश्वराने दिलेले वरदान आहे.झोपेमुळे शरीर व मन दाेन्हीही स्वस्थ असतातत. व्यसनी माणसालाझोप लागत नाही. ज्यांना निद्रानाश आहे ते हळूहळू नैराश्यात जातात व त्यामुळे हृदयविकार, अर्धांग वायूसारखे आजार हाेण्याची शक्यता आहे. अशा वेळी डॉक्टरांकडे जाऊन निराकरण करावे.

बातम्या आणखी आहेत...