आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासर्वांची ईडा, पीडा टळू दे, सर्वांना सुखी, समाधानी, आनंदाने राहू दे यासह सर्वांचे संकटे नष्ट होऊ दे या प्रार्थनेसह समाजातील अनिष्ट प्रथा, व्यसनाधीनता, हेवेदावे, द्वेष, मत्सराचे दहन करीत सोमवारी शहरातील विविध भागांमध्ये होळी जल्लाेषात साजरी करण्यात अाली. मायादेवीनगरातील शनि मंदिरासमोर साडी, हार-कंगन, फुलमाळ, खणा-नारळाच्या ओटीने सजवलेल्या हाेळीला तब्बल ३०० नारळांची आहुती देण्यात अाली. अर्धवट जळालेले नारळ प्रसाद म्हणून उपस्थित भाविकांना वाटप करण्यात अाले. मायादेवीनगरातील श्री विठ्ठल शंकर बजरंग सेवा संस्था संचलित शनि मंदिरात होळीला कोरी साडी नेसवून हार-कंगन फुलमाळा घालून खणा- नारळाच्या ओटीने सजवण्यात आले हाेते.
एरंडाच्या फांदीला चारही बाजूने ३०० नारळांचा थर रचण्यात आला. ही नारळे भाविकांकडून अर्पण करण्यात अाली हाेती. सायंकाळी ७ वाजून १६ मिनिटांच्या मुहूर्तावर होळी पेटवण्यात आली. होळीत अर्धवट जळालेले नारळ भाविकांना प्रसाद म्हणून वाटप करण्यात अाली. या जळालेल्या नारळाची राखही भाविकांनी घरी नेली. मंदिराचे अध्यक्ष रमाकांत गोराणे, सचिव मनोज गोराणे यांनी मंत्रोच्चारात होळीचे दहन केले. होळीत जमा झालेल्या राखेस दूध भाताचा नैवेद्य दाखवून गुरुवारी मेहरूण तलावावर विसर्जन केले जाणार असल्याचेही मनोज गोराणे यांनी सांगितले.
गाईच्या पाच हजार गाेवऱ्यांची विक्री
पर्यावरणपूरक होळीमध्ये गाईच्या शेणाच्या गाेवऱ्या जाळल्या जातात. त्यामुळे या गाेवऱ्यांना सोमवारी अधिक मागणी होती. पांजरपोळ गोशाळेत दोन दिवसांत पाच हजार गाेवऱ्या विक्री झाल्याची माहिती संस्थेचे उपाध्यक्ष अशोक धूत यांनी दिली. तळहाताला झाकणाऱ्या आकारातील गाेवऱ्या ६०० ते ७०० रुपये शेकडा भावाने विकल्या गेल्या. तसेच अनेक ठिकाणी नागरिकांनी कचऱ्याची हाेळी केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.