आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अपघात:दोन बसमध्ये चिरडून एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू, बस रिव्हर्स घेत असताना झाला अपघात

जळगाव10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
वर्कशाॅपमध्ये या दाेन्ही गाड्यांमध्ये भिकन लिंडायत हे दाबले गेले हाेते. इनसेटमध्ये भिकन लिंडायत - Divya Marathi
वर्कशाॅपमध्ये या दाेन्ही गाड्यांमध्ये भिकन लिंडायत हे दाबले गेले हाेते. इनसेटमध्ये भिकन लिंडायत
  • जळगावात एसटी वर्कशॉपमधील घटना; कुटुंबीयांना घातपाताचा संशय

नेरीनाका परिसरातील एसटी वर्कशॉपमध्ये रविवारी सकाळी ९.५० वाजता बस रिव्हर्स घेताना मागे उभ्या असलेल्या चार्जमनला बसचा धक्का लागला. या वेळी दोन बसमध्ये दाबले गेल्यामुळे चार्जमनचा जागेवरच मृत्यू झाला.

भिकन शंकर लिंडायत (वय ५७, रा. एसटी कॉलनी) असे मृत चार्जमन यांचे नाव आहे. लिंडायत हे गेल्या आठ दिवसांपासून सुटीवर होते. यानंतर रविवारी सकाळी ८ वाजता ते ड्यूटीवर गेले होते. वर्कशॉपमध्ये दुरुस्त झालेल्या एका एसटीच्या मागे उभे राहून ते चालक सतीश वानखेडे यांना दिशानिर्देश देत होते. यातच मागे एक बस उभी असल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही. तर समोरच्या वाहकाने बस वेगाने रिव्हर्स घेतल्याने त्यांना धक्का लागला. त्यामुळे लिंडायत हे दोन्ही बसच्या मधे दाबले गेले. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. काम सुरू करताच अवघ्या काही क्षणांमध्ये झालेल्या या अपघातामुळे एसटी वर्कशॉपमध्ये प्रचंड खळबळ उडाली. उपस्थित इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लिंडायत यांना सुरुवातीला दोन खासगी रुग्णालयात नेले. या रुग्णालयात त्यांना दाखल करून घेतले नाही. त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. लिंडायत यांच्या पश्चात पत्नी, मुलगा जयेश व दोन विवाहित मुली असा परिवार आहे.

३१ डिसेंबरला होती लिंडायत यांची सेवानिवृत्ती

आठ दिवसांपासून सुटीवर असलेल्या लिंडायत यांना रविवारी अचानक फाेन करून ड्यूटीवर बोलावले होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्यांना त्रास दिला जात होता. कोरोना संसर्ग असूनदेखील बेकायदेशीरपणे त्यांना ड्यूटीवर बाेलावले. यानंतर त्यांच्यासोबत ही घटना घडली. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी लिंडायत यांचे चिरंजीव जयेश यांनी केली आहे. लिंडायत हे ३१ डिसेंबर २०२० रोजी सेवानिवृत्त होणार होते. तत्पूर्वीच काळाने त्यांच्यावर घाला घातला.

बातम्या आणखी आहेत...