आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात गुन्हा दाखल:अज्ञात व्यक्तीने अश्लील कॉल करून तरुणाकडून उकळली 39 हजार रुपयांची खंडणी

जळगाव23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्हॉटसअ‌ॅपवर एका अज्ञात व्यक्तीने अश्लील चॅटींग, व्हिडीओ कॉल करून नंतर धमकी देत एका तरुणाकडून 39 हजार रुपयांची खंडणी उकळली. यानंतर जीवे करण्याची धमकी दिली. याप्रकरणी शुक्रवार, 10 जून रोजी सायबर पोलिस ठाण्यात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विरोधकांना व्हिडीओ पाठवू...

अरशद अली मुख्तार (वय 32) यांना फोन करून या अज्ञात व्यक्तीने खंडणी मागितली. फेब्रुवारी 2021 रोजी एक अज्ञात व्यक्तीने अरशद यांना फोन केला. तसेच अज्ञात व्यक्ती अश्लील मेसेस पाठवत होती. असे असताना दोन महिन्यांत या व्यक्तीने त्यांच्याकडून खंडणी मागण्यास सुरुवात केली. पैसे न दिल्यास चॅटींग, व्हिडीओ कॉलचे चित्रण समाज माध्यमात व्हायरल करण्याची धमकी दिली. अरशद हे राजकारणात सक्रीय असल्यामुळे विरोधकांना व्हिडीओ पाठवण्याचीही धमकी दिली.

प्रतिसाद देऊ नका...

अशा प्रकारे या व्यक्तीने तीन वेळा अरशद अली मुख्तार यांना फोन करुन 39 हजार रुपयांची खंंडणी ऑनलाइन स्वरुपात घेतली. यानंतर वारंवार पैशांची मागणी सुरुच होती. अखेर अरशद यांनी सायबर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. पोलिस निरीक्षक लीलाधर कानडे पुढीस तपास करत आहेत. दरम्यान, अनोळखी मोबाइल क्रमांकावरून हाेणाऱ्या अश्लील चॅटींग, व्हिडीओ कॉलला प्रतिसाद देऊ नका, सोशल मीडिया वापरताना काळजी घ्यावी अशा सूचना पोलिस अधिकारी देत आहे.

बातम्या आणखी आहेत...