आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जामनेरमध्ये विक्षिप्त प्रकार:ऑनलाइन खरेदी केलेली महिलांची अंर्तवस्त्रे घरी पाठवून तरुणाचा मानसिक छळ

जळगाव19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगावमधल्या जामनेरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका 35 वर्षीय तरुणाला मानसिक त्रास देण्यासाठी एका अज्ञात व्यक्तीने वेगळीच शक्कल लढवली. त्याने या तरुणाचा मेल आयडी हॅक करून विविध ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून महिलांचे अंतर्वस्त्र खरेदी करून या तरुणाच्या घरी पाठवून देत त्याला मानसिक त्रास देणे सुरू केले आहे. हा प्रकार 6 जून पासून सुरू असून, या याप्रकरणी तरुणाने मंगळवारी सायबर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात तक्रार नोंदवली आहे.

कॅश ऑन डिलिव्हरी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही अज्ञात व्यक्ती ऑनलाइन शॉपिंग अ‌ॅपवरून महिलांचे अंर्तवस्त्र खरेदी करत आहे. तसेच या वस्तू पाठवण्यासाठी फक्त कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे. गेल्या दोन आठवड्पासून हा सगळा प्रकार सुरू असून, तरुण व त्याचे कुटुंब चिंतेत असल्याचे पोलिसांना सांगितले.

नक्की प्रकरण काय?

6 जून रोजी या अज्ञात व्यक्तीने तरुणाच्या घरी पहिले पार्सल पाठवले. असे असताना दररोज एक दोन पार्सल या तरुणाच्या नावावर येत होते. विशेष म्हणजे आलेल्या सर्व पार्सलमध्ये फक्त महिलांचे अंगवस्त्र आढळून आले आहेत. असे असताना तरुणासह त्याचे कुटुंबीय देखील चकीत झाले आहेत. आपण कोणत्याच प्रकारची ऑनलाइन खरेदी करीत नसताना पार्सल काय येत आहेत याचा तपास तरुणाने घेतला. यावेळी त्याच्या नावाचा बनावट मेल आयडीवरुन कुणीतरी हा खोडसाळपणा करत असल्याचे आढळुन आले. या प्रकारामुळे तरुणास प्रचंड मानसिक त्रास होत असल्याने अखेर त्याने आरोपीविरोेधात सायबर पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिस निरीक्षक लीलाधर कानडे या पुढील प्रकारणाचा तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...