आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्याचे तापमान सहा अंशांवर:अॅन्जिओप्लास्टी झालेले रुग्णही करतात स्विमिंग; रक्ताभिसरण हाेतेय सुरळीत

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात गारठा वाढला अाहे. अशा परिस्थितीत शुक्रवारी सकाळी सात वाजता शहरातील पोलिस मुख्यालयाच्या आवारातील जलतरण तलावात पाच बायपास झालेले तर १५ ते १६ अॅन्जिओप्लास्टी झालेले कोमॉर्बिड रुग्ण हे स्विमिंग करताना बघायला मिळाले. या वेळी पाण्याचे तापमान सहा अंश सेल्सिअस इतके होते. शरीरात हर्ड इम्युनिटी तयार करण्यासाठी स्विमिंग केले जात असून हृदयविकाराचा त्रास कमी झाल्याचे या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरीकांसह डॉक्टरांनी सांगितले.

स्विमिंगमुळे रक्ताभिसरण सुरळीत होते. हृदयविकार, भूक वाढवणे, स्नायूंचा ताण, ताणतणाव कमी करणे, झोप लागणे, अतिरिक्त फॅट्स कमी करणे, शरीरातील दूषित रक्त कमी करणे, गुडघे दुखी राेखण्यासाठी स्विमिंग उपयाेगी.

कोमॉर्बिड, मधूमेहींना फायदा होतो. स्विमिंग करणाऱ्या रूग्णांची इम्युनिटी वाढते. दरम्यान, १० किमी अंतर चालल्याने जितका फायदा होतो तितका ४५ मिनिटांच्या स्विमिंगने होताे असे डॉ. तिलक नारखेडे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...