आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेणाऱ्या काळात होणाऱ्या निवडणुकांमध्ये शिंदे गट पूर्णपणे बॅकफूटला जाणार असून लोकसभेत त्यांना एकही जागा मिळणार नाही आणि विधानसभेत बोटावर मोजण्या इतका त्यांचा आकडा असेल, असा दावा राष्ट्रवादीचे मुख्य प्रतोद अनिल पाटील यांनी केला आहे.
एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना घेऊन राज्यात सत्तांतर केले. शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत फूट पडली. शिंदे यांनी भाजपशी हातमिळवणी करून राज्यात शिंदे-फडणवीसांचे सरकार आले. ते सत्तेत आल्यापासून सातत्याने शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सरकार कोसळणार असल्याचे दावे करत आहेत. आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिंदे गट बॅकफूटवर जाणार असून सरकार कोसळणार असल्याचे वक्तव्य करण्यात आले आहे.
युतीला मिळतेय चांगले यश
राज्यात शिंदे-फडणवीसांचे सरकार आल्यानंतर अनेक ठिकाणी ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीत या युतीला चांगले यश मिळाले आहे. ठाकरे गटापेक्षा शिंदे गटाला या निवडणुकांमध्ये अधिक जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे राज्यात लोकसभा आणि विधानसभेत शिंदे गटाला चांगल्या जागा मिळतील असा अंदाज वर्तवला जात असताना राष्ट्रवादीचे मुख्य प्रतोद अनिल पाटील यांच्या या दाव्याने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
चित्र स्पष्ट होईल
यावेळी बोलताना अनिल पाटील म्हणाले, अजून काही दिवस थांबा दिल्ली अजून दूर आहे. येणाऱ्या काळात शिंदे सरकार आपल्याला एक स्टेप मागे गेलेलं दिसणार आहे. येणाऱ्या 3-4 महिन्यात शिंदे गट बॅकस्टेजला गेलेला दिसेल. शिंदे गटाला लोकसभेच्या शून्य जागा मिळतील. मात्र विधानसभेतही जे 40 आमदार आहेत त्यांचीही संख्या शून्यावर जाईल किंवा बोटावर मोजण्याइतक्या त्यांच्या जागा येतील. येणाऱ्या काळात सर्व चित्र स्पष्ट होईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.