आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाैपदरीकरण:अंकलेश्वर ते बऱ्हाणपूर 80 किमीचे हस्तांतरण पूर्ण ; दुरुस्तीसाठी न्हाईकडून प्रस्ताव सादर

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तीन राज्यांना जाेडणाऱ्या अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाल्यानंतर हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील ११८ किमी पैकी ८० किमी अंतराचे हस्तांतरण पूर्ण झाले आहे. या महामार्गाचे चाैपदरीकरण करण्यात येणार आहे. तत्पूर्वी अस्तित्वातील महामार्गाच्या देखभाल, दुरुस्तीसाठी ‘न्हाई’कडून दिल्ली येथे प्रस्ताव पाठवला आहे.

गुजरात व मध्य प्रदेशाला जाेडणाऱ्या तळाेदा ते रावेर या २३२ किमी लांबीच्या अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गाचे २०२१ मध्ये राष्ट्रीय महामार्गात रूपांतर झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ‘न्हाई’कडे या महामार्गाचे हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. यावल विभागातील ८० किमी लांबीच्या महामार्गाच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उर्वरित उपविभागांकडून हस्तांतरणासाठी आवश्यक असलेले कागदपत्र मागवलेे आहेत. माहिती प्राप्त झाल्यानंतर त्या त्या भागातील महामार्गासाठी न्हाईकडून प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...