आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्नेहसंमेलन:रायसोनी महाविद्यालयात अंतराग्नी वार्षिक‎ स्नेहसंमेलन रंगले; विजेत्यांना बक्षीस प्रदान‎‎

जळगाव20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ‎ इंजिनिअरिंग अॅण्ड बिझनेस‎ मॅनेजमेंट महाविद्यालयात अंतराग्नी‎ वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच झाले.‎ या स्नेहसंमेलनात अंतराग्नी‎ पारितोषिकातील विजेत्यांना‎ गौरवण्यात अाले.‎ पारितोषिक वितरणप्रसंगी‎ रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका‎ प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल यांनी‎ सांगितले की, विद्यार्थ्यांनी स्वत:तील‎ क्षमता‎ ओळखून ध्येय ठरवावे. मन‎ व शरीर सुदृढ‎ ठेवून सांस्कृतिक,‎ बौद्धिक व सर्वांगीण‎ विकास साधता‎ येतो. विद्यार्थ्यांनी रोज‎ योगाभ्यास व‎ धावण्याचा सराव‎ नियमित करावा‎ तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये‎ यशस्वी होऊन‎ उद्योग क्षेत्रात प्रगती‎ करावी.

पारितोषिक वितरण‎ कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा.‎ मयूर जाखेटे यांनी काम पाहिले.‎ यात ३०० पारितोषिके वितरित‎ करण्यात आली. या वेळी‎ उपसंचालक व प्रा. डॉ. प्रणव‎ चरखा, प्रा. डॉ. संजय शेखावत‎ उपस्थित होते. भाविका घाटे व‎ देवश्री भक्कड यांनी सूत्रसंचालन‎ केले. प्रा.वसिम पटेल व प्रा. राहुल‎ त्रिवेदी यांनी आभार मानले. या वेळी‎ प्राध्यापक व विद्यार्थी अादी उपस्थित‎ हाेते.‎

बातम्या आणखी आहेत...