आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा शहरी व ग्रामीण भागात अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या फ्लॅटधारकांना त्यांचे स्वतंत्र प्रॉपर्टी कार्ड मिळू शकणार आहे. पहिल्या टप्प्यात ‘अपार्टमेंट डीड’ असलेल्यांना व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड देण्याबाबत महसूल विभागाकडून नियोजन करण्यात येते आहे. मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर राज्यात त्यांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. गावठाणातील जागांचे सर्वेक्षण करून यापूर्वी तेथील जागांना प्रॉपर्टी कार्ड देण्यात आले आहेत. दुसऱ्या टप्प्यात अपार्टमंेटमध्ये व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड पद्धत लागू करण्यात येणार आहे.
शहरी व ग्रामीण भागात उर्ध्वाकार विकासासाठी राज्य सरकाने एक स्वतंत्र रेकॉर्ड तयार करण्यासाठी आणि अपार्टमेंटच्या नोंदणीचा निर्णय घेतलेला आहे. पहिल्या टप्प्यात महारेरा नोंदणीकृत योजनांमधील फ्लॅट मालकांना व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड देण्याबाबत नियोजन आहे. फ्लॅट पद्धतीत स्वतंत्र प्रॉपर्टी कार्डही अस्तित्वात नाहीत.
सोसायटीच्या जमिनीचे एक प्रॉपर्टी कार्ड बनवले जाते. ते सोसायटीच्या किंवा विकासकाच्या नावावर असते. फ्लॅटमालकांशी नोंदणी किंवा करार होतात. मनपाकडे त्यांची नावे असतात. मात्र, महसूल विभागाकडे त्याची कोणत्याही प्रकारची नोंद नसते. उर्ध्वाकार पद्धत लागू झाल्यास फ्लॅटचे स्वतंत्र प्रॉपर्टी कार्ड तयार हाेतील.
व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्डमुळे बँकांचे कर्ज घेताना अडचणी येणार नाहीत. अपार्टमेंटच्या ठोस रेकॉर्डअभावी बँक कागदपत्रांच्या मागणीवर जोर देतात. व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड लागू झाल्यानंतर अतिरिक्त दस्तऐवज लागणार नाहीत. स्वामित्व, बँकेचे कर्ज व इतर विवरणांसह फ्लॅटसाठी पूरक व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड निश्चित करण्यात येणार आहे.
महसूल वाढणार, लवकरच शासनाची मंजुरी
फ्लॅटचे क्षेत्र, मालकी, जसे व्यवहार होतील, कर्ज, बोजा अशा नोंदीसह प्रॉपर्टी कार्ड बनेल. व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्डचा मूळ उद्देश शासनाचा महसूल वाढवणे हा आहे. ७/१२ संगणकीकरणानंतर २ वर्षांत लाखो उतारे डाऊनलोड करण्यात आले. त्यातून शासनाला महसूल मिळाला. त्याच धर्तीवर हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.
मंजुरीनंतर अंमलबजावणी, हरकतीही मागवल्या हाेत्या
व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड पद्धती संदर्भात अध्यादेश प्रसिद्ध करण्यात आलेला होता. त्यावर हरकती मागवण्यात आल्या होत्या. शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर राज्यात ही पद्धत लागू होईल. त्या अंतर्गत प्रत्येक फ्लॅटधारकाला आगामी काळात स्वतंत्र प्रॉपर्टी कार्ड मिळू शकेल. एम.पी. मगर, जिल्हा अधीक्षक, भूमिअभिलेख विभाग, जळगाव
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.