आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिव कॉलनी पुलाजवळ मनस्वी सोनवणे या दुचाकीस्वार तरुणीस डंपरने धडक दिल्याने तिचा मृत्यू झाला. दरम्यान, डंपरमालकाने अपघातानंतर पीयूसी काढल्याचे समोर आले होते. चौकशी केली असता इन्शुरन्सदेखील अपघातानंतर काढल्याचे उघडकीस आले आहे.
हा अपघात १५ नोव्हेंबर रोजी झााला हाेता. एमएच-१९, सीवाय-३३११ या क्रमांकाच्या डंपरने तरुणीस धडक दिली आहे. हा डंपर कासट ब्रिक्स, पाळधी या नावाने रजिस्टर्ड आहे. तर संतोष त्र्यंबक पाटील (रा. मामाजी ऑटो गॅरेज अॅण्ड पीयूसी सेंटर, खोटेनगर) यांनी अपघात घडल्यानंतर पीयूसी काढून दिले आहे. दरम्यान, पीयूसी काढण्यासाठी वापरलेला डंपरच्या नंबर प्लेटचा फोटो मोबाइलवरुन पाठवलेला आहे.
डंपरमालकाला अपघात विमा भरपाईचा फटका बसू नये म्हणून हा खटाटोप सुरू असल्याचे प्राथमिक चौकशी समोर आले आहे. २९ डिसेंबर २०२१ पर्यंत या डंपरच्या इन्शुरन्सची मुदत होती. म्हणजेच विना इन्शुरन्स हा डंपर वाहतुकीच्या वापरात होता. पीयूसी काढून देणारे वाहनाचेही (एमएच-१२, एएफ-२३४२) फिटनेस, इन्शुरन्स नाही. हे वाहन संतोष पाटील यांच्या नावावर देखील नाही. बेकायदेशीरपणे या वाहनाला पीयूसी सेंटर चालवण्याची परवानगी दिली आहे. असे गंभीर प्रकार चौकशीत समोर येत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.