आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुदतवाढ:पदविका अभ्यासक्रमासाठी 8 जुलैपर्यंत अर्जांची मुदत; यादी 15 जुलैला जाहीर

जळगाव20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

​​​बारावीनंतरच्या औषधनिर्माणशास्त्र, हॉटेल व्यवस्थापन व खाद्यपेय व्यवस्था तंत्रज्ञान, सरफेस कोटिंग तंत्रज्ञान अभ्यासक्रम प्रथम वर्ष (पोस्ट एचएससी) पदविका अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना ८ जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहेत. या अभ्यासक्रमाच्या तात्पुरत्या गुणवत्ता याद्या ११ जुलैला तर अंतिम गुणवत्ता यादी १५ जुलैला जाहीर करण्यात येणार आहे.

तंत्रशिक्षण संचालनालयांतर्गत शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करता पोस्ट एचएससी पूर्णवेळ पदविका अभ्यासक्रम राबवणाऱ्या राज्यातील शासकीय, अशासकीय अनुदानित, विद्यापीठ संचलित खासगी विनाअनुदानित पदविका शैक्षणिक संस्थांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

असे आहे वेळापत्रक
९ जून ते ८ जुलै : ऑनलाइन नोंदणी, कागदपत्राच्या स्कॅन छायाप्रती अपलोड करणे
९ जून ते ८ जुलै : कागदपत्रांची पडताळणी आणि अर्ज भरल्याची निश्चिती
११ जुलै : विद्यार्थ्यांसाठी संकेतस्थळावर तात्पुरत्या गुणवत्ता याद्या प्रदर्शित करणे.
१२ ते १४ जुलै : गुणवत्ता याद्यांच्या संदर्भात तक्रार असल्यास त्या सादर करणे.
१५ जुलै : अंतिम गुणवत्ता याद्या सुस्पष्टपणे प्रदर्शित करणे.

बातम्या आणखी आहेत...